Bicholim Janata Darbar:  Dainik Gomantak
गोवा

Bicholim Janata Darbar: साखळीत 'जनते'विनाच 'दरबार'! कार्यक्रमात नागरीकांपेक्षा अधिकारी जास्त

मंत्री सुभाष शिरोडकर यांनीही व्यक्त केली खंत; लोकांच्या समस्या संपल्या असलीत - आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये

Akshay Nirmale

Bicholim Janata Darbar: गोवा सरकारने लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी जनता दरबार या कार्यक्रमाची सुरवात केली आहे. आज, सोमवारी ४ ऑगस्ट रोजी साखळीतील रविंद्र भवनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

तथापि, या कार्यक्रमाकडे लोकांनी पाठ फिरवली. त्यामुळे साखळीतील रविंद्र भवनाचे सभागृह ओस पडले होते. जनता दरबार कार्यक्रमाला जनताच उपस्थित नाही, अशी परिस्थिती होती. खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा तालुका असलेल्या साखळीतील जनता दरबार कार्यक्रमात ही परिस्थिती उद्भवली.

या कार्यक्रमाला जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांच्यासह आमदारदेखील उपस्थित होते. कार्यक्रमाला सकाळी साडे नऊ वाजता सुरवात झाली. मंत्रीही वेळेवेर आले होते. परंतू रविंद्र भवनच्या सभागृहात केवळ सरकारी अधिकाऱ्यांचीच गर्दी जास्त होते.

इतर लोकप्रतिनिधीही उपस्थित होते. सकाळी केवळ साडेअकरा पर्यंत केवळ 31 नागरीकांनी प्रश्न विचारण्यासाठी नोंदणी केली होती.

यावरून मंत्री सुभाष शिरोडकर यांनीही खंत व्यक्त केली. मंत्री शिरोडकर म्हणाले की, सरकारी अधिकारी, पंच सदस्य, सरपंच, इतर लोकप्रतिनिधींनी या कार्यक्रमाचा प्रसार केला पाहिजे.

डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनीही याबाबत खंत व्यक्त केली. आमदार शेट्ये म्हणाले की, एकतर लोकांच्या समस्या संपल्या असतील किंवा सरकारने कार्यक्रमाची जागा चुकीची ठेवली असेल. कार्यक्रम डिचोलीचा पण स्थळ साखळीत असे असल्याने जनता दरबारला कमी प्रतिसाद मिळाला असावा.

दरम्यान, गतवेळी जेव्हा डिचोलीत कार्यक्रम झाला होता तेव्हा जनता दरबार कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला होता. तेव्हा काही नागरीकांची गैरसोय झाली होती. त्या कार्यक्रमात मंत्री सुदिन ढवळीकर उपस्थित होते.

तेव्हा गर्दी आणि नागरीकांच्या गैरसोयीमुळे यावेळी कार्यक्रम मोठ्या अशा साखळीतील रविंद्र भवनात आयोजित करण्यात आला होता. तथापि, याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेल नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

Asia Cup 2025: यूएईमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आशिया कपपूर्वी जाणून घ्या दुबई-अबू धाबीतील आकडेवारी

SCROLL FOR NEXT