Bicholim Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : ‘अबोली’ला समाधानकारक बहर; हवामानाचा परिणाम

Bicholim News : शिमगोत्सवात फुले स्वस्त होण्याचे संकेत

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News :

डिचोली, पोषक हवामानामुळे यंदा ''अबोली'' फुलांना समाधानकारक बहर आला असून, यंदा शिमगोत्सवात अबोली स्वस्त होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

''अबोली'' ही एक झुडूपवर्गीय वनस्पती. सुवासिक नसली, तरी नाजूक आणि आकर्षक रंगामुळे अबोलीची फुले सुंदर दिसतात. कोणत्याही फुलांच्या पंक्तीत हे फूल उठून दिसते. त्यामुळे या फुलांना मागणी असते.

असंतुलित हवामानामुळे गेल्यावर्षी स्थानिक ''अबोली'' फुलांच्या बहरावर मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे गेल्यावर्षी मागणीच्यावेळी ऐन शिमगोत्सवात बाजारात ''अबोली''च्या फुलांचा तुटवडा निर्माण झाला होता. यंदा मात्र उष्ण हवामानामुळे सर्वत्र अबोली फुलांनी बहरल्या आहेत.

डिचोलीच्या बाजारात अबोलीची फुले दिसून येत आहेत. अबोलीच्या वेण्या आणि वेळेसर बाजारात उपलब्ध होत असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत त्यांचे दरही परवडण्यासारखे आहेत. पुढील आडवड्यापासून फुलांची आवक वाढण्याची शक्यता आहे.

यंदा ‘अबोली’ला अच्छे दिन

पावसाळा संपल्यानंतर साधारण फेब्रुवारी-मार्च महिन्या दरम्यान ''अबोली''ची फुलांचा बहर असतो. शिमगोत्सवात साजरी होणारी घोडेमोडणी आणि कळसोत्सवात ''अबोलीं''च्या फुलांना प्रचंड मागणी असते. असंतुलीत हवामान आणि अधूनमधून पडलेल्या पावसामुळे गेल्यावर्षी ''अबोलीं''च्या फुलांवर मोठा परिणाम झाला होता.

गेल्यावर्षी बाजारात अबोलीच्या फुलांचा तुटवडा होता आणि भावही वाढला होता. त्यामुळे कर्नाटकातून येणाऱ्या फुलांना ‘अच्छे दिन’आले होते. यंदा मात्र बाजारात स्थानिक अबोलीच्या फुलांना तुटवडा जाणवणार नाही. तसे संकेतही फूल विक्रेत्यांकडून मिळाले आहेत.

‘अबोलीं''च्या स्थानिक फुलांना मागणी असल्याने आधीच ही फुले महाग असतात. त्यातच तुटवड्यामुळे गेल्यावर्षी या फुलांचा भाव वाढला होता. गेल्यावर्षी अबोलीच्या फुलांच्या बहरावर ५० टक्क्यांहून अधिक घट झाली होती.

गेल्यावर्षी शिमगोत्सव काळात ३५० रुपये प्रती गजरा (झेला), तर ८० ते १०० रुपये वेणी (फाती) असे अबोलीचे दर होते. अबोलीच्या फुलांना समाधानकारक बहर आल्याने फुलांचे दर नियंत्रणात राहणार.

सीमा नाईक, फूलविक्रेती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT