Health Camp Dainik Gomnatak
गोवा

Bicholim Health Campaign: ‘वेदांता’तर्फे लामगावात खास आरोग्य शिबिर

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim : वेदांता सेसा गोवाने आयोजित केलेल्या महिलांसाठीच्या विशेष आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ, लामगावच्या 73 हून अधिक महिलांना झाला, ज्यांनी आवश्यक औषधांसह जनरल आणि स्त्रीरोग तपासणी या सेवांचा लाभ घेतला.

सामुदायिक आरोग्य सेवेबद्दलच्या वचनबद्धतेनुसार, ‘वेदांता सेसा गोवा’ने भटवाडा, लामगाव येथे महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. महिलांना अत्यावश्यक आरोग्य सेवा प्रदान करणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता.

स्थानिक प्रशासन व ‘वेदांता सेसा गोवा’ मधील अनेक उल्लेखनीय कार्यकर्त्‍यांनी यावेळी हजेरी लावली. ज्यात स्थानिक नगरसेवक, सुदन गोवेकर, वेदांता सेसा गोवाचे क्लस्टर प्रमुख - मायनिंग, संतोष मांद्रेकर आणि वेदांता सेसा गोवाच्या सीएसआर आणि ईएसजीच्या प्रमुख, लीना वेरेकर यांचा समावेश

होता. या मान्यवरांच्या सहभागाने, वेदांता सेसा गोवाची समुदाय विकास आणि कल्याणासाठीची वचनबद्धता अधोरेखित झाली. यावेळी लामगाव परिसरात महिला उपस्थित होत्या.

महिलांसाठी हे विशेष आरोग्य शिबिर म्हणजे सेसा गोवा येथे, आमच्यासाठी आम्ही कार्यरत असलेल्या समुदायांप्रती परतफेड करण्याची एक अप्रतिम संधी आहे. आमचा प्रयत्न #TransformingCommunities आहे, ज्याद्वारे आमच्या कार्यक्षेत्रातील आसपासच्या लोकांपर्यंत पोहोचून, स्त्रियांसाठी दर्जेदार आरोग्य सेवा उपक्रम राबवले जातात.

-धीरजकुमार जगदीश, ‘आयर्न ओर गोवा’चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT