Bicholim Municipality : घरपट्टी, कार्यालयांचे भाडे थकले; डिचोली पालिकेचे कडक कारवाईचे संकेत

दुकानांना सील ठोकणार; कामाला लागण्याचे निर्देश
Bicholim Municipality
Bicholim MunicipalityDainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim Municipality : घरपट्टी आणि भाड्यातून डिचोली पालिकेला चार कोटीहून अधिक रुपयांची थकबाकी येणे असल्याची माहिती पालिका सूत्रांकडून मिळाली आहे. ही थकबाकी वसुल करण्याचे मोठे दिव्य पालिकेसमोर उभे ठाकले असून, पालिकेने त्यादृष्टीने पावले उचलली आहेत.घरपट्टी, भाडे थकविलेल्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.

दुकानांसह पालिकेच्या मालमत्तेत असलेल्या सरकारी कार्यालयांकडूनही भाडे थकले आहे. भाडे वसुलीसाठी थकबाकी असलेल्या आस्थापनांना पालिकेने नोटीसही बजावली आहे. दिलेल्या मुदतीत थकबाकी भरली नाही, तर कडक कारवाई करण्यात येणार आहे. ''दुकानांना ''सील''ही ठोकण्यात येणार आहे.

डिचोली बाजार परिसरात दुकाने मिळून ३०० हून अधिक आस्थापने आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दुकाने आदी काही आस्थापनांकडून गेल्या काही वर्षांपासूनचे भाडे थकीत आहे. औद्योगिक वसाहतीतील काही आस्थापनांकडून येणे असलेली थकबाकी मोठी असल्याचे समजते.

Bicholim Municipality
Goa Traffic Police: मायकल लोबो यांनी केले वाहतूक पोलिसांना लक्ष्य; तालांवच्या रूपाने पर्यटकांची सतावणूक

कामाला लागण्याचे निर्देश

पालिकेचे मुख्याधिकारी सचिन देसाई यांनी भाडे थकबाकीचा हा विषय गांभीर्याने घेतला आहे. पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची त्यांनी एक बैठक घेऊन थकबाकीचा आढावा घेतला. थकबाकी वसुलीसाठी कामाला लागा.

असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार अधिकारी कामाला लागले आहेत. थकबाकीदारांना नोटीसाही जारी करण्यात आल्या आहेत. सरकारी कार्यालयांकडून येणे असलेली थकबाकी वसुलीसाठी शासकीय पातळीवर पाठपुरावा सुरु आहे.

Bicholim Municipality
Goa Monsoon Red Alert: राज्यात आज अतिवृष्टीची शक्यता; सावधानतेची सूचना

आर्थिक कसरतीची समस्या

भाडे थकल्याने डिचोली पालिकेला सध्या आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. पालिका कामगारांना पगार देताना कसरत करावी लागत आहे.

दिलेल्या मुदतीत थकबाकी भरली नाही, तर संबंधितांविरोधात कडक कारवाई करण्यावाचून पर्याय नाही, असे मत नगराध्यक्ष पुंडलिक फळारी व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com