Bicholim  Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : शिरगाव शाळा इमारतीला नवा साज; ४० लाख खर्चून नूतनीकरण

Bicholim News : लईराई देवस्थानच्या जागेमध्ये वर्ग स्थलांतरित

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News : डिचोली, कमकुवत झालेल्या आणि सध्या बंद असलेल्या शिरगावातील सरकारी प्राथमिक शाळा इमारतीला नवा साज मिळणार आहे. सुमारे ४० लाख रुपये खर्च करून या इमारतीचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.

बुधवारी (ता.१४) आमदार प्रेमेंद्र शेट यांनी या कामाचा शुभारंभ केला. याप्रसंगी जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर, सरपंच करिश्मा गावकर, उपसरपंच जयंत गावकर, पंचसदस्य, देवस्थान समितीचे अध्यक्ष गणेश गावकर, पालक-शिक्षक संघ, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि पालक उपस्थित होते.

शिरगाव शाळेसाठी नवीन इमारतीचा प्रस्ताव आला होता. मात्र, पालकांकडून आलेल्या सूचनांचा विचार करून सध्याच्या इमारतीच्या नूतनीकरणाचा निर्णय घेण्यात आला. पुढील शैक्षणिक वर्षापूर्वी इमारतीचे काम पूर्ण करण्यावर भर असेल, असे आमदार शेट म्हणाले. शंकर चोडणकर, करिश्मा गावकर यांनी आमदार शेट यांचे आभार मानले.

पालकांत समाधान :

वास्तविक येथे नवी इमारत बांधावी, अशी पालकांची मागणी होती. परंतु इमारतीचे नूतनीकरण होत असल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले. पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेश गावकर आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लक्ष्मी कवठणकर यांनी तात्पुरती जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल देवस्थान समितीला धन्यवाद दिले.

जमिनीवर बसून ज्ञानार्जन

जुलैपासून शाळेचे वर्ग देवस्थानच्या जागेत भरत आहेत. सध्या येथे २५ विद्यार्थी शिकत आहेत. या विद्यार्थ्यांच्या मानाने वर्ग स्थलांतरित केलेली जागा अपुरी आहे. या जागेत विद्यार्थी दाटीवाटीने आणि जमिनीवर बसून शिकत आहेत.

देवस्थानच्या जागेत वर्ग

या इमारतीला सुमारे ६० वर्षे होत आली असल्याने ती अत्यंत कमकुवत झाली असून, छपराची मोडतोड झाली आहे. चालू शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीलाच पावसात वर्गात गळती सुरू झाली. गळती रोखण्यासाठी इमारतीवर प्लास्टिकचे आच्छादन घातले.

मात्र, त्याचा फारसा फायदा झाला नाही. शाळेतील वीज जोडणीही धोकादायक अवस्थेत आहे. इमारत मोडकळीस, त्यातच वीज जोडणीपासून मुलांना धोका ओळखून वर्ग स्थलांतरित करण्याचा निर्णय पालकांनी घेतला. अखेर श्री लईराई देवस्थानच्या बंद घरात वर्ग स्थलांतरित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT