प्रसंगावधान ओळखून चालकाने वेळीच हॅण्डब्रेक लावल्याने कारसह चालक आणि अन्य एक मिळून दोघेजण नदीत बुडता-बुडता बचावले. ही घटना काल (रविवारी) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास चोडण -पोंबुर्फा जलमार्गावरील चोडण बाजूच्या फेरीधक्क्यावर घडली. मृत्यूच्या दाढेतून बचावलेले ते दोघेही उत्तरप्रदेशमधील आहेत अशी माहिती मिळाली.
डिचोली अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेवून मदतकार्य करून कार सुरक्षितपणे बाहेर काढली.
अग्निशमन दलाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, यूपी-70-बीई-3877 ही कार चोडण पोंबुर्फा जलमार्गाच्या दिशेने जात होती. मोटारीत चालकासह दोघेजण होते.
एकाबाजूने पाऊस पडत होता, त्यातच रात्रीची वेळ आणि वीज नसल्याने अंधार पसरलेला होता. त्यातच चालकाला फेरी धक्क्याचा अंदाज आला नाही. दलाचे अधिकारी राहुल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लिडींग फायर फायटर राजन परब यांच्या नेतृत्वाखाली दलाच्या जवानांनी मदतकार्य केले.
चालकाने आपण प्रसंगावधान राखून हालचाल केल्याने तो आणि सहप्रवासी बचावू शकले,असे चालकाने बाहेर पडल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना सांगितले.
चालक सावध !
फेरीधक्क्यावर फेरीबोटही नव्हती. चालकाने गाडी तशीच पुढे नेली. मात्र, गाडी पाण्यात जातेय, याची कल्पना येताच चालकाने प्रसंगावधान राखून गाडीचा हॅण्डब्रेक ओढला.आणि चालकासह गाडीतील दोघेही बाहेर आले. घटनास्थळी पोचल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी दोरखंड बांधून गाडी मागे ओढली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.