Shantadurga Devsthan Makahrotsav Dainik Gomantak
गोवा

Makahrotsav: शांतादुर्गेच्या मखरोत्सवाला उत्साहात प्रारंभ! भाविकांची गर्दी; कीर्तन रंगले

Shantadurga Devsthan Makahrotsav: गावकरवाडा येथील शांतादुर्गा देवस्थानात नवरात्रोत्सवाची धूम सुरू असून मखरोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरवात झाली आहे.

Sameer Panditrao

डिचोली: गावकरवाडा येथील शांतादुर्गा देवस्थानात नवरात्रोत्सवाची धूम सुरू असून मखरोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरवात झाली आहे. दरम्यान, शेकडो भक्तगणांच्या साक्षीत देवस्थानात एकशे आठ सामूहिक सत्यनारायण पूजेचा संकल्प मंगल आणि भक्तिमय वातावरणात रविवारी पूर्ण झाला.

दांपत्यांसह देवीच्या भक्तगणांनी या सामूहिक सोहळ्यात मोठ्या संख्येने भाग घेतला. दुपारी आरती, तीर्थप्रसाद झाल्यानंतर महाप्रसाद झाला. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर इंदोर-मध्यप्रदेश येथील ऐवज भांडारे यांचे कीर्तन झाले. त्यानंतर मखरोत्सव साजरा झाला.

नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात मखरोत्सवाला गुरुवारपासून सुरवात झाली असून बुधवारपर्यंत हा उत्सव साजरा होणार आहे. मखरोत्सवानिमित्त मंदिरातील मूर्ती सिंहारूढरुपी सजविण्यात येते. रात्री फुलांनी सजविलेल्या मखरात बसवून आरतीच्या तालावर झुलवण्यात येते. मखरोत्सव पाहण्यासाठी भाविक गर्दी करतात. यानिमित्त फुगड्या, भजन, कीर्तन आदी कार्यक्रम होतील.

गुरुवारी महाभिषेक

गुरुवारी दसरोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सकाळी महाभिषेक होणार आहे. सायंकाळी ५ वा. तरंगांची पूजा केल्यानंतर सिमोलंघन, सोने लुटणे आदी कार्यक्रम होतील, असे शांतादुर्गा देवस्थान ग्रामस्थ गावकर मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: "अरे पाकिस्तान कुछ तो करके दिखा... थू", पाकड्यांची चिमुकल्याने काढली लाज; Viral Video पाहा

Rama Kankonkar Attack: रामाचेर हल्ल्या पयली रेस्टॉरंटान कितें घडले? Video

'तुझ्या तोंडावर शेण टाकले, मारहाण केली, याचा बदला घ्यायला हवा'; 'रामा'ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अभिनेता राजदीपचे डोळे पाणावले Watch Video

Goa Opinion: सोने, देवभोळेपण, चोरी; संपादकीय

Goa Slum: झोपडपट्टीवासीयांना पक्की घरे देऊ देत, पण नवी झोपडपट्टी उभी राहणार नाही याची दक्षता घेतली जाणार काय़?

SCROLL FOR NEXT