Bicholim Market Dainik Gomantak
गोवा

Bicholim: डिचोलीत झाली 4 टन फुलांची विक्री, भाव वाढल्याने विक्रेते आनंदी; चतुर्थीच्या पूर्वदिनी 'अच्छे दिन'

Bicholim Market: चतुर्थीनिमित्त डिचोलीत फुलांचा बाजार फुलला असून, बाजारात सध्या फुलांना ‘अच्छे दिन’ आले आहेत.

Sameer Amunekar

डिचोली: चतुर्थीनिमित्त डिचोलीत फुलांचा बाजार फुलला असून, बाजारात सध्या फुलांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. गणेशभक्तांकडून विविध प्रकारच्या फुलांना प्रचंड मागणी असल्याचे चित्र दिसून येत आहे.

चतुर्थीच्या पूर्वदिनी आज (मंगळवारी) एकाच दिवसात डिचोलीत तीन ते चार टन फुलांची विक्री झाल्याचा अंदाज आहे. सायंकाळी तर बाजारातून फुले गायब झाली होती. डिचोली बाजारात फुलांना तेजी आली असून, पुढील काही दिवस तरी फुलांना मागणी कायम राहणार आहे. मागणी असल्याने फुलांचा भावही वाढला आहे.

पुढील दोन दिवसांत फुलांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असून, तसे झाल्यास फुले आणखी महाग होण्याची शक्यता आहे. तसे संकेतही विक्रेत्यांकडून मिळाले आहेत.

घरोघरी गणरायाच्या आगमनाच्या पूर्वदिनापासून बाजारात फुलांचा खप वाढला आहे. आज (मंगळवारी) सायंकाळी तर फुले खरेदीला प्रचंड जोर आला होता. मंगलमूर्ती गणरायाच्या नावाने फुलांना मागणी असल्याने, फुलांच्या बाजारातील वातावरणही खुलून उठल्याचे दिसून येत आहे. डिचोलीच्या बाजारपेठेत कर्नाटक राज्यातून झेंडू, डिस्को, सफेद मिळून विविध प्रकारची शेवंती, लहान गुलाब, अस्टर या ठरावीक फुलांची आवक् होत असते.

मागील दोन दिवसांपासून बाजारात फुलांची प्रचंड आवक होत आहे. स्थानिक जाईची फुलेही बाजारात उपलब्ध होत असली, तरी त्याचे प्रमाण कमी आहे. फुलांना मागणी वाढल्याने फुलांचे दरही वाढले आहेत.

त्यामुळे विक्रेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सध्या झेंडू फुलांचे दर २०० रुपये किलो असे आहेत. तर सफेद शेवंती, लांब देठाची आणि डिस्को शेवंती आणि लहान गुलाब ६०० रुपये किलो याप्रमाणे विकण्यात येतआहेत.

रेडिमेड हारांनाही मागणी

फुले महाग झाली असली, तरी गणेशभक्त दराच्याबाबतीत कोणतीही ‘घासाघीस’ न करता, उत्साहाने फुले खरेदी करताना दिसून येत आहेत. सुट्या फुलांप्रमाणेच फुलांच्या रेडिमेड हारांनाही प्रचंड मागणी आहे. विविध प्रकारचे फुलांचे हार तर गणेशभक्तांना आकर्षित करत आहेत. पुढील किमान पाच दिवस तरी फुलांना भाव येणार असून, तुटवडा निर्माण झाल्यास फूले आणखी महागण्याची शक्यता आहे. तसे संकेतही विक्रेत्यांनी दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Peace University: तंत्रज्ञानाने जग जवळ आले, पण मने दूरच! विश्वशांतीसाठी राज्यपालांचे महत्त्वाचे आवाहन; 'डब्ल्यूपीयू'च्या परिषदेचे थिवीत उद्‌घाटन

खरी कुजबुज: मंत्र्यांचा पाठिंबा नेमका कोणाला?

Bungalow Sale Fraud: बंगला विक्रीचे आमिष दाखवून निवृत्त कर्मचाऱ्याला गंडा; 99.50 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

America School Shooting: अमेरिकेतील प्राथमिक शाळेत अंधाधुंद फायरिंग! 3 चिमुकल्यांसह 5 जणांचा मृत्यू, 16 वर्षांचा हल्लेखोरही ठार; परिसरात खळबळ

Goa Cricket Association Audit: जीसीएचा कारभार वादात! 50 कोटींच्या व्यवहारांवर लेखापरीक्षणात गंभीर आक्षेप; चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT