Goa Migrant Workers: राज्‍यात 83,301 परप्रांतीय कामगार, शोभा करंदलाजे यांनी राज्यसभेत सादर केली आकडेवारी

Migrant Workers: राज्‍यात परप्रांतीय आणि असंघटित क्षेत्रातील ८३,३०१ कामगार असल्‍याचे केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्‍यमंत्री शोभा करंदलाजे यांनी माहिती दिली.
Goa Migrant Workers
Goa Migrant WorkersDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्‍यात परप्रांतीय आणि असंघटित क्षेत्रातील ८३,३०१ कामगार असल्‍याचे केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्‍यमंत्री शोभा करंदलाजे यांनी राज्‍यसभेतील लेखी प्रश्‍‍नाच्‍या उत्तरात सादर केलेल्‍या आकडेवारीतून समोर आले आहे.

खासदार डॅरेक ओब्रायन यांनी पश्‍चिम बंगालमधील स्थलांतरित कामगारांसंदर्भात प्रश्‍‍न विचारला होता. त्‍यावर मंत्री करंदलाजे यांनी पश्‍चिम बंगालसह देशभरातील सर्वच राज्‍यांमधील परप्रांतीय आणि असंघटित कामगारांची आकडेवारी सादर केलेली आहे.

त्‍यानुसार १८ ऑगस्‍ट २०२५ पर्यंत गोव्‍यातील परप्रांतीय आणि असंघटित ८३,३०१ कामगारांनी ई–श्रम पोर्टलवर नोंदणी केलेली असल्‍याचे मंत्री करंदलाजे यांनी उत्तरात म्‍हटले आहे. तर, देशभरात असे सुमारे ३१.४४ कोटी कामगार असल्‍याचेही आकडेवारीतून दिसून येते.

Goa Migrant Workers
Goa Politics: कामत, तवडकरांना गणेश चतुर्थीनंतरच खाती; मंत्री, नेते गणेशोत्सवात व्यग्र; समर्थकांमध्ये वाढली उत्सुकता

केंद्र सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाने २६ ऑगस्ट २०२१ रोजी ई–श्रम पोर्टल सुरू केले. या पोर्टलद्वारे ३० व्यापक व्यवसाय क्षेत्रांमध्ये आणि सुमारे ४०० व्यवसायांमध्ये स्वयं-घोषणापत्रावर नोंदणी करता येते.

त्‍यानुसार १८ ऑगस्‍ट २०२५ पर्यंत या पोर्टलवर देशभरातील ३१ कोटींहून अधिक असंघटित कामगारांनी नोंदणी केली आहे. या कामगारांच्‍या आवश्‍‍यक त्‍या सर्व गरजा पूर्ण करण्‍यासाठी केंद्र सरकार प्रयत्‍नशील असल्‍याचेही करंदलाजे यांनी नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com