Bicholim Rain Dainik Gomantak
गोवा

Bicholim: डिचोली परिसरात पूरस्थिती नियंत्रणात; स्थलांतरीत घरी परतले

Goa Flood: आमदारांसह अधिकाऱ्यांकडून पाहणी, बाजारातील व्यवहार सुरू

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: काल (गुरुवारी) उच्छाद मांडलेल्या पावसाचा जोर कमी झाल्याने डिचोलीतील जनतेने सुटकेचा श्वास घेतला आहे. आज (शुक्रवारी) सकाळी आणि दुपारी किरकोळ वगळता दिवसभर जोरदार पर्जन्यवृष्टी झाली नाही. डिचोली बाजारातील पाणी ओसरल्याने काही प्रमाणात व्यवहार सुरू झाले.

बुधवारी रात्रीपासून काल गुरुवारी दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र धुमाकूळ घातला होता. सर्वत्र हाहाकार उडाला होता. कोसळधार पावसामुळे डिचोलीसह वाळवंटी नदीच्या पाण्याची पातळी वाढली होती. काल (गुरुवारी) तर मुसळधार पावसाने कहर केला होता.

नद्यांनी धोक्याची पातळी पार केली होती. काही भागात तर पाणी बाहेर फुटून जलमय स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी डिचोलीतील पूरग्रस्त स्थितीची पाहणी करुन नुकसानीचा आढावा घेतला. त्यांच्यासोबत उपजिल्हाधिकारी रोहन कासकर, संयुक्त मामलेदार श्रीपाद माजिक आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

स्थलांतरीत घरी परतले!

मुसळधार पावसामुळे पिळगावमधील बागवाडा येथे तर पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. सात ते आठ घरांनी पाणी घुसले होते. पुराच्या वेढ्यामुळे काहीजण घरात अडकून पडले होते. अडकलेल्या नऊजणांची अग्निशमन दलाने सुखरूप सुटका केली होती. या नऊजणांना बागवाडा शाळेत स्थलांतरीत करण्यात आले होते. काल मध्यरात्री पूरसदृश्य स्थिती नियंत्रणात आल्यानंतर स्थलांतरीत केलेल्या नागरिकांनी घर गाठले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT