Bicholim Fire Incident Dainik Gomantak
गोवा

Bicholim Fire Incident: डिचोलीत टळला मोठा अनर्थ! माळरानावर भडकली आग; बकऱ्या सुरक्षित

Bicholim Fire News: नववर्षाच्या पूर्वसंध्येला डिचोलीत माळरानाला आग लागण्याची घटना घडली. या घटनेत माळरान पूर्णपणे जळून खाक झाले.

Sameer Panditrao

Fire Incident In Bicholim

डिचोली: नववर्षाच्या पूर्वसंध्येला डिचोलीत माळरानाला आग लागण्याची घटना घडली. या घटनेत माळरान पूर्णपणे जळून खाक झाले. आग वेळीच नियंत्रणात आल्याने अनर्थ टळला. या घटनेत मोठीसी आपत्ती ओढवली नसली, तरी माळरानात चरायला गेलेल्या बकऱ्या सुरक्षित बचावल्या.

वाठादेव येथील झांट्ये महाविद्यालया समोरील मुख्य रस्त्याला लागून असलेल्या माळरानाला आग लागण्याची घटना घडली. झांट्ये बंधूची ही मालमत्ता असल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच डिचोली अग्निशमन दलाचे लिडींग फायर फायटर साईनाथ केसरकर यांच्या नेतृत्वाखाली दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

दलाचे चालक गीतेश नाईक यांच्यासह संजय उसपकर, रुपेश पळ आदी जवानांनी मदतकार्य करुन आग नियंत्रणात आणली. आग लागली, त्यावेळी वीसच्या आसपास बकऱ्या माळरानात चरत होत्या. मात्र या बकऱ्यांनी वेळीच माळरानातून सुरक्षितस्थळी धाव घेतल्याने त्या बचावल्या. असे बकऱ्यांचे पालन करणाऱ्या युवकाकडून सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT