Kudne Mahakund Gomantak Digital Team
गोवा

Bicholim : कुडणे येथील होमकुंड उत्साहात साजरा

शेकडो धोंड भक्तगणांच्‍या साक्षीने देवीचे अग्निदिव्य पार पडले.

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim : कुडणे येथील श्री देवी महालक्ष्मी कुडणेश्वर देवस्थानचा प्रसिद्ध होमकुंड जत्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शेकडो धोंड भक्तगणांच्‍या साक्षीने देवीचे अग्निदिव्य पार पडले. देवस्थान समितीने प्रतिबंध केल्याने यंदा जत्रोत्सवात गोबी मंच्युरियनचे स्टॉल्‍स नव्‍हते.

जत्रोत्सवानिमित्त काल सोमवारी पहाटेपासून दुपारपर्यंत श्रींच्या मूर्तींस अभिषेक व अन्‍य धार्मिक विधी पार पडले. सायंकाळी नवीन धोंडगण मानवण्यात आले. रात्री ११ वाजता हरवळे येथील श्री देव रुद्रेश्वराकडून भेटीच्या रूपाने आलेल्या ओटीचा स्वीकार करण्यात आला. मध्यरात्री होमकुंड प्रज्वलित केल्यानंतर धोंडगणांचे स्नान करण्यासाठी सातेरी देवीच्या तळीवर प्रस्थान झाले.

आज मंगळवारी पहाटे श्री रवळनाथ व देवी महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने धोंडगणांनी रखरखत्या होमकुंडातून अग्निप्रवेश केला. नंतर श्रींचे अग्निदिव्य झाले. मंडपात सर्वांना कौल देऊन मुख्य जत्रोत्सवाची सांगता झाली. अग्निदिव्य पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

juva: सफर गोव्याची! चारही बाजूने नदी आणि मध्ये वसलेले 'जुवे'

Thailand School Shooting: चिमुकल्यांच्या किंकाळ्यांनी हादरलं थायलंड! 18 वर्षांच्या माथेफिरुची अंधाधुंध फायरिंग; 22 मुलांसह 36 जणांचा मूत्यू VIDEO

IND vs PAK: भारतीय खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंशी करणार हँडशेक? पाकड्यांच्या 'या' अटीवर काय म्हणालं आयसीसी?

Rajpal Yadav: राजपाल यादवच्या मदतीला धावला 'भाईजान'! अजय देवगण, वरुण धवनसह मदतीसाठी सरसावले बॉलिवूड

VIDEO: शाळेच्या मैदानात किंकाळ्या अन् रक्ताचा सडा! माथेफिरुच्या गोळीबारात 10 ठार, 24 जखमी; काळजाचा ठोका चुकवणारी घटना

SCROLL FOR NEXT