Dr. Babasaheb Ambedkar Birth Anniversary Dainik Gomantak
गोवा

Ambedkar Jayanti 2023 : डॉ.बाबासाहेबांमुळेच देशाला महत्त्व - डॉ. चंद्रकांत शेट्ये

डॉ. चंद्रकांत शेट्ये : डिचोलीत बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आपल्या देशाला जागतिक पातळीवर मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. घटनेचे शिल्पकार असलेल्या डॉ. बाबासाहेबांनी चौफेर क्षेत्रात योगदान देत देशाला बलवान बनविले. त्यांचा आदर्श आजच्या युवा पिढीने घेऊन समाजासाठी योगदान द्यावे, असे आवाहन डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी केले.

शहरातील हरिजनवाडा-बोर्डे येथे राष्ट्रोळी युवा, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती कार्यक्रमात डॉ. चंद्रकांत शेट्ये प्रमुख पाहूणे या नात्याने बोलत होते.

यावेळी प्रमुख वक्ते या नात्याने पत्रकार दुर्गादास गर्दे उपस्थित होते. अन्य मान्यवरांत नगराध्यक्ष कुंदन फळारी, उपनगराध्यक्ष सुखदा तेली, सावित्रीबाई फुले मंचची अध्यक्ष अर्चना गायकवाड, गोविंद परवार, दत्ताराम परवार , दीप्तेश परवार, दीपाली परवार यांचा समावेश होता.

सुखदा तेली यांनी दलित बांधवांच्या समस्या सोडवण्यास आपण कटिबध्द असल्याचे सांगितले. आपल्या कारकीर्दीत दलित बांधवांचा आशीर्वाद आपल्याला कायम लाभत असल्याचे सांगून सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

डॉ. आंबेडकरांचे कार्य मानवहितासाठी !

डॉ. आंबेडकर यांचे कार्य केवळ दलित समाजापुरते मर्यादित नाही, तर मानवी कल्याणाची भूमिका त्यांनी मांडली. त्यांचे कार्य संपूर्ण देशाला स्वतंत्रता, समता, आणि बंधुभाव या त्रिसूत्रीव्दारे प्रेरणा देणारे आहे. रामराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची कास धरावी लागेल, असे आवाहन प्रमुख वक्ते दुर्गादास गर्दे यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT