Bicholim city security Dainik Gomantak
गोवा

Bicholim News:डिचोली शहराची सुरक्षा बेभरवशाची; 1 कोटी रुपये खर्चून बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे 'शोभेची वस्तू'!

Bicholim CCTV issue: एक कोटी रुपये खर्चून बसविण्यात आलेले ४५ सीसीटीव्ही कॅमेरे आता नादुरुस्त झाल्याने शहरातील सुरक्षा व्यवस्था बेभरवंशाची झाली

Akshata Chhatre

डिचोली: डिचोली शहराच्या सुरक्षेसाठी खासदार निधीतून सुमारे एक कोटी रुपये खर्चून बसविण्यात आलेले ४५ सीसीटीव्ही कॅमेरे आता नादुरुस्त झाल्याने शहरातील सुरक्षा व्यवस्था बेभरवंशाची झाली आहे. महत्त्वाच्या ठिकाणी बसविण्यात आलेले अनेक कॅमेरे गेले काही दिवस बंद असून, ते केवळ शोभेच्या वस्तू बनले आहेत. यामुळे सध्या राज्यात घडत असलेल्या दरोडे, चोऱ्या आणि अन्य गुन्ह्यांच्या तपासकामात मोठा अडथळा निर्माण होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

बगलमार्गावरील जंक्शनसह महत्त्वाचे कॅमेरे बंद

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात इन्फॉटेक महामंडळाच्या सहकार्याने हे ४५ सीसीटीव्ही कॅमेरे विविध ठिकाणी बसवण्यात आले होते. या कॅमेऱ्यांमुळे गुन्हे शोधण्यात पोलिसांना मदतही झाली होती. मात्र, आता अनेक ठिकाणी कॅमेऱ्यांनी काम करणे बंद केले आहे.

नवीन चौपदरी बगलमार्गावरील व्हाळशी जंक्शन सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी बसविण्यात आलेले कॅमेरे बंद आहेत. यासोबतच, शहरातील अन्य काही भागातील कॅमेरेदेखील गेल्या काही दिवसांपासून नादुरुस्त स्थितीत आहेत.

गुन्हे तपासणीत अडथळा, नागरिकांमध्ये भीती

सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यामागे गुन्ह्यांवर लक्ष ठेवणे, नियमबाह्य वाहतूक, कचरा समस्या आणि 'हिट अँड रन' सारख्या गैरकृत्यांविरुद्ध कारवाई करणे, हा मुख्य उद्देश होता. मात्र, कॅमेरे बंद असल्यामुळे आता या महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे येत आहेत.

सध्या राज्यात दरोडे आणि चोऱ्यांसारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असताना, डिचोली शहरातील सीसीटीव्ही व्यवस्थेचे नादुरुस्त असणे नागरिकांसाठी चिंतेची बाब ठरली आहे.

नगराध्यक्षांनी दिले दुरुस्तीचे आदेश

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या या स्थितीबद्दल डिचोलीतील नागरिक आणि संबंधित यंत्रणांकडून तीव्र मागणी होत आहे की, बंद असलेले कॅमेरे तातडीने पूर्ववत सुरू करावेत.

या प्रश्नावर बोलताना नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर यांनी माहिती दिली की, "मध्यंतरीही काही कॅमेरे बंद असल्याची माहिती मिळाली होती. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दुरुस्ती करून ही व्यवस्था त्वरित पूर्ववत सुरू करावी, अशा सूचना संबंधित कंत्राटदार कंपनीला देण्यात आल्या आहेत."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रीडा विश्वात खळबळ! वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या दिग्गज क्रिकेटपटूला होणार अटक, नेमकं प्रकरण काय?

Yamuna Expressway Accident: यमुना एक्सप्रेसवेवर थरार! दाट धुक्यामुळे आठ बस आणि तीन कारची टक्कर; 4 जणांचा मृत्यू VIDEO

Goa Winter Update: राज्यात थंडीचा कडाका वाढला, पुढील काही दिवस कसं असेल हवामान? वाचा

Anjuna Illegal Hotel: मुख्‍य सचिवांसह 7 प्रतिवादींना नोटिसा, हणजूण येथील बेकायदा हॉटेल प्रकरणी याचिकेची दखल

गोवा आध्‍यात्‍मिक पर्यटनाचे केंद्र व्हावे, क्लब रात्री 12 नंतर बंद करावेत; दुर्घटना कमी होतील- मंत्री विश्‍‍वजीत राणे

SCROLL FOR NEXT