City Livelihood Center

 

Dainik gomantak

गोवा

डिचोलीत 'सिटी लायव्हलीहूड सेंटर', महिला गटांना मिळणार व्यासपीठ

पालिकेच्या सहकार्यातून फळ-भाजी बाजार संकुलात हे 'सिटी लायव्हलीहूड सेंटर' सुरु करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

डिचोली : महिलांना स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर होण्यास मदत ठरु शकणारे 'सिटी लायव्हलीहूड सेंटर' डिचोलीत कार्यान्वित करण्यात आले आहे. राज्यातील पहिलेच असलेल्या या केंद्राचे सोमवारी (ता.27) सायंकाळी डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर (Rajesh Patnekar) यांच्या हस्ते थाटात उदघाटन करण्यात आले. जी-सुडाच्या योजनेंतर्गत हे केंद्र सुरु करण्यात आले आहे.

उदघाटनानंतर बोलताना सभापती राजेश पाटणेकर यांनी केंद्र सुरु करण्याचा प्रथम मान डिचोली पालिकेला मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या केंद्राच्या माध्यमातून महिला गटांना व्यासपीठ मिळणार असून, महिलांनी त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा. असे आवाहनही सभापतींनी केले. या सेंटरसह विक्री दालनाचेही सभापती पाटणेकर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

उदघाटन (Inauguration) सोहळ्यास डिचोलीचे नगराध्यक्ष कुंदन फळारी, पालिकेचे मुख्याधिकारी क्लेन मदेरा, नगरसेवक (Corporator) रियाज बेग, विजयकुमार नाटेकर, सुदन गोवेकर, निलेश टोपले, गुंजन कोरगावकर, ऍड. अपर्णा फोगेरी, ऍड. रंजना वायंगणकर, दीपा पळ आणि दीपा शिरगावकर यांच्यासह 'सुडा'ची प्रकल्प सल्लागार श्रीमती सेलसा आंतोन आणि व्हिन्सी, पालिकेचे अभियंता राजेश फडते, पालिकेच्या सामाजिक प्रकल्प समन्वयक अरुणा परबवाडकर आदी उपस्थित होते.

सेलसा आंतोन यांनी यावेळी बोलताना सेंटरचा उद्धेश आणि त्यापासून मिळणारे फायदे याविषयी माहिती देऊन, महिलांनी सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे. असे आवाहन केले. क्लेन मदेरा यांनी पालिकेच्या कार्याची स्तुती केली. कुंदन फळारी आणि अनिता परबवाडकर यांनी आपले विचार मांडले. दीपा शिरगावकर यांनी आभार मानले.

असे आहे केंद्र

पालिकेच्या (Municipality) सहकार्यातून फळ-भाजी बाजार संकुलात हे 'सिटी लायव्हलीहूड सेंटर' सुरु करण्यात आले आहे. या केंद्रासाठी जी-सुडाकडून 10 लाख रुपये अर्थसाहाय्य मंजूर झाले आहे. पालिका क्षेत्रातील नोंद असलेल्या महिला स्वयंसहाय गटांकडून तयार करण्यात येणारे खाद्यपदार्थ आणि अन्य वस्तूंना या केंद्राच्या माध्यमातून बाजारपेठ (Market) मिळणार आहे. यामुळे महिलांना स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर होण्यास मदत होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT