Bicholim Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : डिचोलीत शहर परिसरात वाढली बिबट्याची दहशत; लोक भयभीत

Bicholim News : , वन विभागाने लावला सापळा; भर शहरात लोकवस्तीजवळच बिबट्याचा संचार असून, या बिबट्याने काही कुत्र्यांनाही फस्त केल्याची माहिती मिळाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News :

चोली, ग्रामीण भागात बिबट्यांची दहशत वाढली असतानाच, आता डिचोलीत मुख्य शहराजवळ बिबट्याचा संचार असल्याची माहिती मिळाली आहे.

भर शहरात लोकवस्तीजवळच बिबट्याचा संचार असून, या बिबट्याने काही कुत्र्यांनाही फस्त केल्याची माहिती मिळाली आहे.

लोकवस्तीजवळ संचार आणि बिबट्याच्या दहशतीमुळे शहरवासियांमध्ये घबराट पसरली आहे. बिबट्याचा संचार असलेल्या परिसरातील लोक रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्याचे धाडस करीत नाहीत. दरम्यान, या बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याने सापळा (पिंजरा) लावला आहे.

दोन महिन्यांपूर्वी डिचोलीतील कातरवाडा-धबधबा परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. अखेर गेल्या जानेवारी महिन्याच्या १३ तारखेला या बिबट्याला पकडण्यात वन खात्याला यश आले होते. आता तर डिचोलीत भर शहरात लोकवस्तीजवळ बिबट्याचा संचार आहे. शहरातील अवचितवाड्याजवळ या बिबट्याचा संचार आहे.

बाजारापासून साधारण तीनशे मीटर अंतरावर मठ मंदिराच्या मागच्या बाजूने संचार करताना हा बिबट्या काहीजणांच्या नजरेला पडला आहे. दोन दिवसांपूर्वी पहाटे मठ मंदिराच्या मागच्या बाजूने कुत्री जोरजोरात भुंकत होती.

बाहेर येऊन पाहिले असता बिबट्या उभा असल्याचे निदर्शनास आले. असे नरेश पेडणेकर यांनी सांगितले. या बिबट्याने परिसरातील काही कुत्री फस्त केल्याचीही माहिती मिळाली आहे.

बिबट्याला पकडण्यासाठी सापळा

लोकवस्तीजवळ संचार करणाऱ्या आणि दहशत माजवलेल्या या बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याचे प्रयत्न चालू आहेत. दोन दिवसांपूर्वी अवचितवाडा येथे सापळाही लावण्यात आला आहे. मात्र अजूनतरी बिबट्या सापळ्यात फसलेला नाही. या बिबट्याला पकडून आम्हांला भयमुक्त करावे. अशी मागणी डिचोलीवासियांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT