डिचोली, शाळांना सुटी म्हटली, की लहान मुलांचे मौजमजा करण्याचे दिवस. किंबहुना मुलांसाठी ती पर्वणी ठरत असते.
एक काळ असा होता, की शाळांना उन्हाळी सुटी पडली, की बहुतांश मुले मामा, मावशी किंवा अन्य नातेवाईकांच्या घरची वाट धरायचे. मात्र आता बदलत्या काळानुसार ही प्रथा मागे पडली आहे. सुटीत मौजमजा करतानाच सुटीचा सदुपयोग करण्यासाठी आज अनेक साधनसुविधा उपलब्ध होत आहेत.
सुटीचा सदुपयोग व्हावा, यासाठी पालकही आग्रही असतात. सध्या शाळांना उन्हाळी सुटी पडल्याने डिचोलीतील बालोद्यानात मुलांचा किलबिलाट वाढत असल्याचे दिसून येत आहे. दुसऱ्या बाजूने शैक्षणिकसह काही संस्थांनी मुलांसाठी उन्हाळी शिबिरांचे आयोजन केले असून, त्यांनाही मुलांकडून प्रतिसाद मिळत आहे.
दोन वर्षापूर्वी लोकार्पण करण्यात आलेले डिचोली शहरातील गृहनिर्माण वसाहतीतील ‘चिल्ड्रन पार्क’ (बालोद्यान) अनेकांना आकर्षित करीत आहे. लहान मुलांसाठी वरदान ठरलेल्या या बालोद्यानात दिवसेंदिवस किलबिल आणि गजबजाट जाणवत आहे. शहरातील अन्य बालोद्याने गजबजत आहेत. सध्या शाळांना सुटी पडल्याने त्यात आता आणखी भर पडली आहे.
राज्य आणि केंद्र सरकारच्या सहकार्याने सुमारे १.२० कोटी रुपये खर्चून गृहनिर्माण वसाहतीत उभारण्यात आलेल्या ‘चिल्ड्रन पार्क’ या बालोद्यानात झोपाळे, घसरगुंडी आदी मुलांना खेळण्यासाठी आवश्यक असलेली साधने उपलब्ध आहेत.
१ डिचोलीतील काही शैक्षणिक संस्थांसह अन्य संस्थांतर्फे उन्हाळी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. डिचोलीतील शांतादुर्गा शाळेतर्फे ७ ते ९ वर्षे वयोगटातील मुलांसाठी येत्या सोमवारपासून (ता.१५) पाच दिवसीय उन्हाळी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
२या शिबिरात योग, प्राणायम, चित्रकला, हस्तकला, श्लोक, स्रोत पाठांतर, कथाकथन, हस्ताक्षर आणि खेळ या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पिळगाव येथील आयडियल हायस्कूलतर्फे ‘कॅलिग्राफी’ या विषयावरील कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
३मुलांच्या अक्षरांमध्ये शंभर टक्के बदल घडविण्याच्या हेतूने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. बारा वर्षे आणि वरील सर्वांसाठी ही कार्यशाळा आहे.
४सर्वण येथील सर्वण फ्रेंड्स सर्कल संघटनेतर्फे मुलांसाठी व्हॉलीबॉल प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय काही संस्थांनी उन्हाळी शिबिरे आयोजन करण्याची तयारी चालवली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.