Cashew Production Declined Dainik Gomantak
गोवा

Cashew Production Declined: काजू पीक घटले; दारूभट्ट्या थंडावल्या, हंगाम अंतिम टप्प्यात

Cashew Production Declined: फेणी उत्पादनातही घट; बागायतदार संकटात

गोमन्तक डिजिटल टीम

तुकाराम सावंत

Cashew Nut Production :

डिचोली, यंदाचा काजू पिकाचा हंगाम जवळपास संपुष्टात आला असून काजू दारू गाळप भट्ट्याही शांत होत आल्या आहेत.

पुढील दोन-तीन दिवसांत या भट्ट्या बंद होतील. यंदा काजूपिकावर परिणाम झाल्याने काजूउत्पादक व गाळपावर परिणाम झाला आहे. विशेष करून फेणी उत्पादनात घट झाल्याचा दावा उत्पादकांकडून करण्यात येत आहे.

अनुकूल हवामानामुळे यंदा काजू हंगामाच्या सुरूवातीस काजूला समाधानकारक बहर आला होता. मात्र मध्यंतरी एप्रिल महिन्याच्या दरम्यान काजूच्या बहरावर परिणाम झाला. स्थानिक काजू बागायतींनी काजू बोंडू कमी झाले. त्यामुळे बहुतांश भागात दारुउत्पादनावर परिणाम झाला, असे उत्पादकांचे म्हणणे आहे.

काजू पीक हा डिचोलीतील बहुतांश भागातील एक प्रमुख व्यवसाय. तालुक्यातील विविध भागात काजू बोंडूंपासून हुर्राक, काजू फेणीचे उत्पादन घेण्यात येते. डिचोलीतील काही दारूउत्पादक व्यावसायिक स्थानिक बागायतींमधून उपलब्ध होणाऱ्या काजूबोंडूसह महाराष्ट्रातील वझरे, माटणे, दोडामार्ग आदी भागातून काजू बोंडूंची आयात करून दारू गाळतात.

डिचोलीत दरवर्षी काजू फेणीचे उत्पादन होते. त्यात ५० टक्क्यांहून अधिक उत्पादन हे राज्याबाहेरील काजू बोंडूंपासून होत असते. यंदा हंगामाच्या अंतिम टप्प्यात महाराष्ट्रातून उपलब्ध होणाऱ्या काजू बोंडूंचे प्रमाणही कमी झाले.

दारूभट्ट्या विझण्याच्या मार्गावर

काजू पिकाच्या हंगामात डिचोली तालुक्यातील सर्वण, मये, कारापूर, नार्वे, धुमासे, कुडचिरे, उसप आदी भागात काजू बोंडूंपासून दारूगाळणीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत असतो. साधारण तीन महिने दारूभट्ट्या पेटतात. यावर्षीही विविध भागात दारूभट्ट्या पेटल्या होत्या. आता काजू हंगाम जवळपास संपुष्टात आल्याने उसप, नार्वे आदी काही भागात दारूगाळणीचा व्यवसाय बंद झाला आहे. दारूभट्ट्यांची आगही विझली आहे. तर, सर्वणसह काही भागात महाराष्ट्रातून उपलब्ध होणाऱ्या काजू बोंडूंपासून दारू गाळण्यात असल्याचे दिसून येते. पुढील दोन दिवसांत या दारूभट्ट्याही बंद होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

फेणी उत्पादनात ४० टक्के घट

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही काजू हंगामात जवळपास पूर्ण दिवस व्यवसाय चालला. मात्र अपेक्षेप्रमाणे काजू पीक मिळाले नाही. त्यातच अखेरीस अवकाळी पावसानेही फटका दिला. यंदा काजू पिकाबरोबरच दारू उत्पादनातही घट झाली आहे, अशी माहिती नार्वे येथील काजू बागायतदार तुकाराम गावडे यांनी दिली.

मध्यंतरी काजू बोंडूंचे प्रमाण घटले. महाराष्ट्रातूनही बोंडू मिळणे कठीण झाले. त्यामुळे फेणी उत्पादनात ४० टक्के घट झाली आहे, असे उसप येथील काजू बागायतदार तुळशीदास गावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: रोहितचा 'आसमानी' षटकार अन् स्वतःच मारली 'कॅच इट'ची हाक! हिटमॅनचा 'तो' व्हायरल व्हिडिओ पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धूमाकूळ

Goa Unseasonal Rain: गुढीपाडव्याला वरुणराजा लावणार हजेरी! गोव्यात 18, 19 मार्चला 'यलो अलर्ट'; विजांच्या कडकडासह बरसणार सरी

Konkan Railway: 'कोकण रेल्वे' मार्गावर मान्सूनपूर्व तपासणी! मडगाव-ठोकूर, मडगाव-रोहा मार्गावर सुरक्षा व्यवस्थेचा आढावा

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी! पगारात होणार 35 टक्क्यांची बंपर वाढ?8व्या वेतन आयोगाबाबत अर्थ मंत्रालयाने मागवल्या सूचना

Canacona: काणकोणात वाढती ‘ड्रग्स’ची तस्करी! पाळोळे, आगोंद परिसर विळख्यात; विद्यार्थी, पालकांसाठी धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT