Bicholim Bus Stand Dainik Gomantak
गोवा

Bicholim: ..अखेर डिचोली बसस्थानक चकाचक! खड्डे बुजवून डांबरीकरण; प्रवाशांत समाधान

Bicholim Bus Stand: शहरातील हंगामी बसस्थानकावरील रस्ता आता चकाचक झाला आहे. संपूर्ण पावसाळाभर दुर्लक्षित राहिलेल्या आणि अत्यंत वाताहत झालेल्या या बसस्थानकावरील खड्डे अखेर बुजवून हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim Bus Stand Road

डिचोली: शहरातील हंगामी बसस्थानकावरील रस्ता आता चकाचक झाला आहे. संपूर्ण पावसाळाभर दुर्लक्षित राहिलेल्या आणि अत्यंत वाताहत झालेल्या या बसस्थानकावरील खड्डे अखेर बुजवून हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात आले आहे.

आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या निर्देशानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता बांधकाम विभागातर्फे हे काम करण्यात आले आहे. बसस्थानकावरील रस्ता चकाचक झाल्याने बसवाल्यांसह प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

शहरातील या बसस्थानकाची अत्यंत दुर्दशा झाली होती. संपूर्ण बसस्थानकावरील खडी उखडून बसस्थानकाची पुरती चाळण झाली होती. सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्यही पसरले होते. पावसाळ्यात तर बसस्थानकाच्या दुर्दशेत भर पडत होती.

जोरदार पाऊस पडल्यानंतर तर बसस्थानकावरील खड्डयांनी पाणी साचत होते. त्यामुळे बसचालकांसह प्रवाशांना मनस्ताप सोसावा लागत असे. खड्डयामुळे वाहनांच्या सुट्या भागांची मोडतोड होत असे. त्यामुळे वाहनचालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता.

बसस्थानकाची डागडुजी करावी. अशी मागणी वाहनचालक आणि प्रवासी पावसाळ्यापूर्वीपासून करीत होते. मात्र त्याकडे आजपावेतो दुर्लक्ष झाले होते.

पावसामुळे काम पडले लांबणीवर

नाही म्हटले तरी गेल्या मे महिन्यात बसस्थानकावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र केवळ ‘पॅचवर्क’ करून खड्डे बुजविल्यानंतर डागडुजीचे काम अर्धवट सोडून सोडून देण्यात आले होते. त्यामुळे बसचालकांसह प्रवासी कामाबाबत प्रश्न उपस्थित करीत होते. मात्र मध्यंतरी पावसाने धुडगूस घातल्याने डांबरीकरण काम लांबणीवर पडले होते, अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: जमिनीच्या दरात वाढ म्हणजे गोव्यावर अन्याय!! विजय सरदेसाईंचे टीकास्त्र

Ranji Trophy: गोवा सलग चौथा विजय मिळवणार का? मिझोरमविरुद्ध पारडे जड; नवीन चेहऱ्यांना संधी

'Cash For Job Scam' केसमधील 'हाय-फाय प्रियाचे' कारनामे होणार उघड! अनेक महिलांकडून उकळले पैसे

Russian in Goa: रशियन आले हो! हंगामाच्या पहिल्या चार्टरने 334 पर्यटक गोव्यात दाखल

'Cash For Job Scam'चे आणखी एक प्रकरण उघड! निवृत्त नौदल कर्मचाऱ्याच्या मुलाकडून 6 लाख उकळले

SCROLL FOR NEXT