Leopard in Mulgao  Dainik Gomantak
गोवा

Bicholim: मुळगावात पुन्हा बिबट्याची दहशत; वन खात्याने लावला सापळा

ऑगस्टमध्ये एक बिबट्या पकडल्यानंतर आता दुसऱ्याचे दर्शन

दैनिक गोमंतक

Leopard in Mulgao Bicholim: दीड महिन्यापूर्वी मुळगावात धुमाकूळ घातलेल्या बिबट्याला पकडण्यात वन खात्याला यश आले होते. मात्र, आता आणखी एका बिबट्याचा मुळगावात संचार सुरू झाल्याने लोकांमध्ये घबराट पसरली आहे.

रात्रीच्यावेळी हा बिबट्या लोकवस्तीतील रस्त्यांवर फिरताना काहीजणांच्या निदर्शनास आला आहे. गावात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने लोक भयभीत झाले आहेत. या बिबट्याला पकडण्यासाठी वन खाते सज्ज झाले असून, बिबट्याला पकडण्यासाठी मुळगावात सापळाही लावला आहे.

ऑगस्ट महिन्यात एका बिबट्याने मुळगावात लोकवस्तीजवळ दहशत माजवली होती. मात्र, अखेर 14 ऑगस्टच्या मध्यरात्री हा बिबट्या वन खात्याने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला. बिबट्याला पकडल्यानंतर मुळगावातील जनतेने सुटकेचा श्वास घेतला होता.

लोकवस्तीत वावर

आणखी एका बिबट्याचा संचार सुरू झाल्याने लोक पुन्हा भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. श्री तळेश्वर घुमटीकडून गावाकडे येणाऱ्या रस्त्यावर सोमवारी रात्री काही युवकांना या बिबट्याचे दर्शन घडले.

दीड महिन्यापूर्वी ज्याठिकाणी बिबट्या पिंजऱ्यात अडकला होता, तेथून साधारण एक किलोमीटर अंतरावर या बिबट्याचे दर्शन घडले. लोकवस्तीजवळ बिबट्याच्या संचारामुळे रात्रीच्यावेळी लोक घराबाहेर पडण्याचे धाडस करत नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT