Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : गव्याची दुचाकीला धडक बसून मयेतील युवक गंभीर

Bicholim News : जखमीवर सध्या गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News : डिचोली,गव्याची धावत्या स्कूटरला धडक बसल्याने स्कूटरस्वार शुभम सुभाष माईणकर (रा. हळदणवाडी-मये) हा विवाहित युवक गंभीर जखमी झाला.

तर मागे बसलेली त्यांची पत्नी किरकोळ जखमी झाली. हा अपघात बुधवारी सायंकाळी उशिरा मये तलाव परिसरात घडला. जखमीवर सध्या गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, शुभम पत्नीसह आपल्या स्कूटर (जीए ११ बी-७२५२)वरून मयेहून डिचोलीकडे जात होते. मये तलावाकडील प्रवेशद्वारापासून साधारण ५० ते ६० मीटर अंतरावर स्कूटर पोहोचली असता, जवळच्या रानातून डाव्या बाजूने धावत आलेल्या गव्याची स्कूटरला जोरदार धडक बसली.

या धडकेबरोबर स्कूटरसह शुभम आणि त्यांची पत्नी रस्त्यावर फेकले गेले. रस्त्यावर आदळल्याने शुभम यांचे तोंड फुटले आणि रक्तस्त्राव सुरू झाला.

लागलीच त्याठिकाणी असलेले माजी सरपंच किशोर कारबोटकर, काजल कारबोटकर आणि इतरांनी मदतकार्य करून शुभमला सामाजिक आरोग्य केंद्रात नेण्याची व्यवस्था केली. आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारांनंतर त्यांना पुढील उपचारासाठी गोमेकॉत हलविण्यात आले.

मये तलाव परिसरात सध्या गव्यांचा संचार आणि धुमाकूळ वाढला आहे. हे गवे रात्रीच्यावेळी रस्त्यावर उभे असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT