वास्को: बायणा समुद्र किनारी छठ पूजा उत्साहात व भक्ती मय वातावरणात पार पडली. शेकडो उत्तर भारतीयांचा जनसागर बायणा समुद्र किनारी लोटला. छठ पूजा ही उत्तर भारतातील स्त्रियांकडून होणारी सूर्यपूजा आहे. या व्रतादरम्यान स्त्रिया निर्जल उपवास करतात व सूर्याला अर्घ्य देऊन हा उपवास सोडण्यात येतो.
हे व्रत सौभाग्य व समृद्धीसाठी करण्यात येते. बिहार व झारखंड राज्यात हे व्रत मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येते. छठ पूजा व्रत चार दिवस चालते आणि २५ ऑक्टोबर रोजी प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी भाविक मीठ वर्ज्य करतात. व्रतस्थ नवे कपडे घालतात. पूजेनंतर,दुधी भोपळा आणि भात प्रसाद म्हणून खाल्ला जातो.
दुसऱ्या दिवसाला खरणा म्हणतात. सूर्यास्तानंतर पितळी भांड्यात बनवलेली दुधाची खीर उपवास करणारा खातो. यानंतर, ३६ तासांचा निर्जला उपवास सुरू होतो. तिसऱ्या दिवशी सूर्याला नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी, उपासक सकाळपासून अन्न-पाण्याविना राहतो. ‘ठेकुआ’ (नैवेद्य) अर्पण केला जातो. चौथ्या दिवशी, म्हणजे सप्तमी तिथी (२८) रोजी उगवत्या सूर्याला ‘अर्घ्य’ अर्पण करून व्रताची सांगता होते.
आमदार कृष्णा साळकर यांनी सपत्नीक छठ पूजेत सहभागी होऊन पूजा केली. सोमवार (दि.२७) रोजी सायंकाळी मुरगाव तालुक्यातील उत्तर भारतीयांतर्फे ‘छठ पूजा’ वास्को बायणा किनारी ‘छठी देवीची’ नित्यपूजा करून साजरी केली. यावेळी मुरगावचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर, नगरसेवक अमय चोपडेकर, नगरसेविका शमी साळकर, मुरगावचे पोलिस उपअधीक्षक गुरुदास कदम, वास्को भाजप गटाध्यक्ष सिद्धार्थ कासकर, प्रशांत नार्वेकर, स्वराज नाईक व इतर नागरिक उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.