वाळपई: ब्रह्माकरमळी येथील मुलांनी येथील ब्रह्मोत्सवामध्ये ‘भुय माझी भांगराची’ हे कोकणी नाटक फक्त पंधरा दिवसांत तालीम घेऊन उभे केले आणि त्यातून पर्यावरण तसेच गाव रक्षणाचा संदेश सर्वांना दिला. या नाटकाने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.या नाटकाचे दिग्दर्शक विनय गावस आणि सर्व कलाकारांनी यासाठी बरीच मेहनत घेतली, त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नाटकाचा विषय हा गावातली खनिज खाण, गावचे मंदिर, गावचे पर्यावरण, गावचे राजकारण आणि गावाचा एकोपा यावर आधारित होता. हे नाट्य प्रकाश वजरीकर यांनी लिहिले होते. वास्तविक सध्या सत्तरी तालुक्याच्या ग्रामीण भागात सामाजिक आशयापेक्षा विनोदी नाटके अधिक चालतात. तरी देखील सामाजिक विषय असलेले नाटक गावातल्या मुलांनी निवडले, हे विशेष होय. या नाटकाला भरभरून प्रतिसाद लाभला.
काही दिवसांपूर्वीच होमखंड हे नाटक विनय गावस यांच्या दिग्दर्शनाखाली फोंडा आणि रवींद्र भवन, साखळी येथे या नाटकातील काही कलाकारांनी सादर केले होते. त्यामुळे ब्रह्मोत्सवात नाटक उभे करण्यासाठी खूपच कमी वेळ होता. तरीदेखील गावतील मुलांनी अशक्य गोष्ट शक्य करून दाखविली आणि एक देखणा नाट्यप्रयोग घडवून आणला.
या नाटकाचा विषय सर्वांना भावणारा होता. एक दर्जेदार प्रयोग बघता आला. हे नाटक आता प्रत्येक गावागावांमध्ये व्हायला पाहिजे. कारण या नाटकातील गाव आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश सर्वत्र जाणे आवश्यक आहे.
- यशवंतराव देसाई, नाट्य रसिक, ब्रह्माकरमळी
या नाटकाने उपयुक्त संदेश लोकांना दिला. गावातल्या मुलांनी अशा प्रकारचे दर्जेदार नाटक उभे करून सर्वांना आश्चर्यचकित केले. अशी सामाजिक आशयाची नाटके आज प्रत्येक गावात सादर होणे गरजेचे आहे.
- संदीप केळकर, ब्रह्माकरमळी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.