Bhutani Project Sancoale Dainik Gomantak
गोवा

Bhutani Project: परवाने नसल्याची ‘भूतानी’ची कबुली! सांकवाळ पंचायतीच्या वकीलांनी दिला 'हा' सल्ला; वाचा संपूर्ण प्रकरण

Bhutani Project Sancoale: सांकवाळ पंचायतीने नेमलेल्या कायदेशीर सल्लागारांपैकी ॲड.झेलर डिसोझा यांनी पंचायतीने न्यायालयात निर्णय होईपर्यंत भूतानी प्रकल्पाबाबत ढवळाढवळ न करता तूर्त बाजूला ठेवावा,असा सल्ला दिला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Bhutani Project Sancoale Permissions

कुठ्ठाळी: सांकवाळ पंचायतीने नेमलेल्या कायदेशीर सल्लागारांपैकी ॲड.झेलर डिसोझा यांनी पंचायतीने न्यायालयात निर्णय होईपर्यंत भूतानी प्रकल्पाबाबत ढवळाढवळ न करता तूर्त बाजूला ठेवावा,असा सल्ला दिला आहे.

या प्रकरणी आज झालेल्या बैठकीत पंच तुळशीदास नाईक आणि मावरेलिओ कार्व्हालो यांनी या सल्ल्यानुसार परवाना स्थगित ठेवण्याची मागणी केली; पण त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून सत्तारूढ गटाचे सर्व सदस्य एकामागोमाग एक उठून निघून गेले.

भूतानी प्रकल्पाविरोधात सांकवाळ ग्रामपंचायतीने बोलाविलेल्या विशेष ग्रामसभेवेळी विरोधी गटातील तीन पंचांनी या प्रकल्पास विरोध असल्याचे सांगून सचिव ओरविल वालीस यांना तसे इतिवृत्त लिहिण्यास भाग पाडले.

असा असेल प्रकल्प

सांकवाळ येथे हा प्रकल्प ४२१७.५० मीटर चौरस क्षेत्रफळात उभारण्यात येणार आहे.

येथे ३० व्हिला आणि ६५५ फ्लॅट मिळून ६८५ बांधकामे उभी राहणार आहेत.

येथील स्विमिंग पुलासाठी ५० लाख ६१ हजार लिटर पाणी लागणार आहे.

याशिवाय पिण्याच्या पाण्याची सोयही आवश्यक आहे.

येथे १० मीटर रुंद रस्त्याची गरज आहे. प्रत्यक्षात येथील रस्ता अरुंद म्हणजे, केवळ ३.८ मीटर एवढाच आहे.

परवाने नसल्याची ‘भूतानी’ची कबुली

भूतानी इन्फ्रा परमेश कन्स्ट्रक्शन या वादग्रस्त प्रकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी सांकवाळ ग्रामपंचायतीची आज सकाळी ११ वाजता विशेष बैठक आयोजित केली होती; पण कोणत्याही निर्णयाविना ही बैठक सोडून सत्तारूढ गटाचे सदस्य उठून निघून गेल्याने विरोधी सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

टीसीपी समितीने आपली निरीक्षणे नोंदवून आक्षेप घेतले आहेत. तसेच आवश्यक ते परवाने मिळाले नसल्याचे खुद्द ‘भूतानी’ने लिखित स्वरूपात पंचायतीला कळविले आहे. या गोष्टींवर विश्वास ठेवून सांकवाळ पंचायतीने हा दिलेला बांधकाम परवाना रद्द करावा, अशी मागणी विरोधी पंच तुळशीदास नाईक आणि मावरेलीओ कार्व्हालो यांनी केली.

या ग्रामसभेला सांकवाळचे ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभास्थळी पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षकांसह मोठा पोलिस फौजफाटा तैनात केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa-Bhopal Flight: 1 डिसेंबरपासून गोवा-भोपाळदरम्‍यान थेट विमानसेवा, पर्यटनाला मिळणार चालना!

Goa Live Updates: पुन्हा धर्मांतरण खपवून घेणार नाही!

"IFFI मुळे भारतीय चित्रपटांचे बहुआयामी रूप समोर आले पाहिजे" डॉ. एल. मुरुगन यांच्याकडून तयारीचा आढावा

गोव्याच्या मुख्य सचिवांना SC ने फटकारले, नियमांतील बदलांसाठी मुख्य न्यायाधीशांच्या नावाचा वापर; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Rain: राज्यात पावसानं पुन्हा उडवली दाणादाण, पर्वरीत वाहनधारकांची त्रेधातिरपिट; चिखलामुळे वाहतूक कोंडी!

SCROLL FOR NEXT