पिसुर्ले: पर्ये मतदार संघाच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी आपल्या जाहीरनाम्यात दिलेल्या माहितीनुसार पर्ये मतदार संघात इकॉटुरीजम प्रकल्पातून रोजगार उपलब्ध करुन देण्याची संकल्पना अमलात आणण्यासाठी कंबर कसली आहे, त्याच अनुषंगाने भुईपाल भेडशेवाडा येथिल सर्वे क्रमांक 23/1 या वन विकास महामंडळाच्या संपूर्ण जागेची पाहणी करून त्या ठिकाणी इकोटूरीजम प्रकल्प उभारणी संदर्भात प्राथमिक स्वरूपात चाचपणी सुरू केली आहे. (Bhuipal village will be transformed; The ecotourism project will get a boost)
सदर सर्वे क्रमांक मध्ये गेल्या काही वर्षापुर्वी सुमारे हजारो चौरस मीटर जमिनीत वन विकास महामंडळाच्यावतीने काजू बागायत उभी केली आहे, परंतू कालांतराने सदर बागायतीत वाढलेल्या इतर प्रकारच्या झाडाझुडुपांमध्ये काजूची झाडे नष्ट झाली असल्याने त्यामधून महामंडळाला हवे तसे उत्पादन मिळत नाही. त्यामुळे या बागायत ही वन विकास महामंडळासाठी पाढंरा हत्ती बनली आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
त्याच बरोबर या ठिकाणी असलेली काजूची झाडे नष्ट झाली असल्याने ती बागायत ओसाड दिसत आहे. परंतु या अगोदर या बागायतीच्या विकासासाठी कोणीच प्रयत्न केलेले दिसले नाही, मात्र वन विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी पर्ये मतदार संघाच्या आमदार डॉ दिव्या राणे यांची निवड झाल्यापासून सत्तरी तालुक्यातील वन विकास महामंडळाच्या ताब्यात असलेल्या काजू बागायतीना अच्छे दिन आले आहेत असे म्हणावे लागणार आहे.
सत्तरी तालुक्याला नैसर्गिक वरदान लाभलेले असून, या नैसर्गिक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी देशी विदेशी पर्यटक या भागात भेटी देत असतात त्यामुळे या ठिकाणी असलेल्या काजू बागायतीत इकोटुरीजम प्रकल्प उभारल्यास परिसरातील नागरिकांना रोजगार, व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध होऊ शकणार, त्याचप्रमाणे बऱ्याच साधन सुविधांची उभारणी येथे होणार असल्याने या भागाचा कायापालट होण्यास फार मदत होणार आहे, त्यामुळे अशा ठिकाणी इकोटूरीजम प्रकल्प उभे राहणे आवश्यक आहे, या साठी वन विकास महामंडळाचे वरीष्ठ अधिकारी तसेच वन खात्याचे अधिकारी यांच्या समवेत या परिसराची पाहणी केली आहे असे आमदार डॉ दिव्या राणे हिने सांगितले.
यावेळी आमदार डॉ. दिव्या राणे यांनी तीन ठिकाणी भेट देऊन पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना त्या प्रमाणे अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत, त्याच प्रमाणे डोबवाडा ते भुईपाल चेकपोस्ट पर्यंत वन खात्याच्या जागेतून जाणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत, त्यामुळे बऱ्याच वर्षांपासून रेंगाळत पडलेल्या सदर सदर रस्त्याच्या कामाला चालना मिळणार असून चेकपोस्ट वाड्यावर जाण्यासाठी भेडशेवाडा व डोबवाडा येथिल नागरिकांना अगदी जवळ पडणार आहे.
पर्ये मतदार संघाच्या आमदार डॉ दिव्या राणे हिने आपल्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करताना इकोटूरीजम प्रकल्पासाठी भुईपाल भेडशेवाडा येथिल जागेची निवड केल्याने नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करून सदर प्रकल्प उभारणीसाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन या वेळी आमदार डॉ दिव्या राणे यांना देऊन सदर प्रकल्प लवकर तडीस लावून या भागातील महिला व युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा असा आशावाद व्यक्त केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.