MLA Digambar Kamat  Dainik Gomantak
गोवा

Highway Expansion Issues: 'देवाला मानणारे कामत आम्हाला न्याय देतील': घर वाचवण्यासाठी भोमवासीयांची मंत्रालयात धाव

Digambar Kamat Assures Bhom Residents Justice: सार्वजनिक बांधकाम खात्‍याचे (पीडब्‍ल्‍यूडी) मंत्री दिगंबर कामत हे देवाला मानणारे आहेत. गेल्‍या तीन वर्षांपासून आम्‍ही आमची घरे वाचवण्‍यासाठी धडपडत आहोत.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: सार्वजनिक बांधकाम खात्‍याचे (पीडब्‍ल्‍यूडी) मंत्री दिगंबर कामत हे देवाला मानणारे आहेत. गेल्‍या तीन वर्षांपासून आम्‍ही आमची घरे वाचवण्‍यासाठी धडपडत आहोत. त्‍यामुळे मंत्री कामत आम्‍हाला निश्‍चित न्‍याय देतील, असा विश्‍‍वास भोममधील नागरिकांनी व्‍यक्त केला आहे.

महामार्ग रुंदीकरणास गेल्‍या तीन वर्षांपासून विरोध करत असलेल्‍या भोममधील नागरिकांनी बुधवारी मंत्रालयात जाऊन मंत्री दिगंबर कामत (Digambar Kamat) यांची भेट घेतली. या विषयाचा सखोल अभ्‍यास करून नागरिकांशी चर्चा करण्‍याची हमी मंत्री कामत यांनी आम्‍हाला दिलेली आहे. महामार्ग रुंदीकरण झाल्‍यास आमची घरे जाणार आहेत. त्‍यामुळे गेल्‍या तीन वर्षांपासून आम्‍ही संघर्ष करत आहोत, असे भोमवासीयांनी सांगितले.

या महामार्गाच्‍या (Highway) रुंदीकरणाला ग्रामस्‍थ पहिल्‍यापासूनच विरोध करत आहेत. या प्रकरणात दिवसेंदिवस वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. सार्वजनिक बांधकाम खाते, वन खाते तसेच संबंधित सर्व सरकारी खात्यांच्या कर्मचाऱ्यांनी रस्‍त्‍याचे सर्वेक्षण करण्‍यासही ग्रामस्थांनी आक्षेप घेतला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: पठ्ठ्यानं ट्रेनलाच बांधली स्टीलची पेटी, सोशल मीडियावर जुगाडाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा लोकांमुळेच बिहार बदनाम होतोय'

Ind vs Aus 2nd ODI: सचिन-विराटलाही जमला नाही 'तो' कारनामा केला, चौकार मारुन रचला इतिहास; कांगारुंच्या भूमीवर हिटमॅनचा रेकॉर्डब्रेक फॉर्म VIDEO

Yagneshwar Nigalye Passed Away: विनोदी, मिश्किल आणि कोटीबाज वाणी, दाभोळकरांच्या 'अंनिस'चा गोव्यात पाया रचणारे यज्ञेश्‍वर निगळ्ये वयाच्या 90 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड!

Goa Editorial: आता हद्द झाली...! संपादकीय

Goa Rain: पावसाचा धुमाकूळ कायम! पुढील चार दिवस गडगडाटासह वादळी वाऱ्याचा इशारा

SCROLL FOR NEXT