Bhausaheb Bandodkar Dainik Gomantak
गोवा

Bhausaheb Bandodkar: 'भाऊसाहेब बांदोडकर यांच्यामुळे गोव्याने सर्वच क्षेत्रांत यशस्वी झेप घेतली'; ढवळीकरांचे गौरवोद्गार

Sudin Dhavalikar: मगो पक्षाला फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा झेप घेण्यासाठी गोमंतकीय युवा पिढीने हातभार लावावा, असे आवाहन मगो पक्षाचे नेते तथा राज्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: मगो पक्षाचे नेते तथा गोव्याचे भाग्यविधाते पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या दूरदृष्टीमुळे गोव्याने सर्वच क्षेत्रांत यशस्वी झेप घेतली. त्या मगो पक्षाला फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा झेप घेण्यासाठी गोमंतकीय युवा पिढीने हातभार लावावा, असे आवाहन मगो पक्षाचे नेते तथा राज्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले.

फर्मागुढी-फोंडा येथे गुरुवारी भाऊसाहेब बांदोडकर जयंतीनिमित्त भाऊसाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर सुदिन ढवळीकर बोलत होते. यावेळी मगो पक्षाच्या कार्यकारिणीचे सदस्य अनंत नाईक, प्रताप फडते, अनिल नाईक तसेच इतर पदाधिकारी, जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, आदिती गावडे, सरपंच, उपसरपंच, पंच सदस्य आणि मगोप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुदिन ढवळीकर म्हणाले की, भाऊसाहेब बांदोडकर हे एक कणखर नेतृत्व होते. त्यांनी सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक व इतर क्षेत्रांत भरीव योगदान दिले. गोव्यात इतर राज्यांपेक्षा साक्षरतेचा दर उच्चांकी आहे. फक्त जे बिगर गोमंतकीय गोव्यात येतात, त्यांच्यामुळे साक्षरतेचा दर वर-खाली होतो; पण भाऊसाहेबांनी शिक्षणाच्या क्षेत्रात जी क्रांती केली, ती अन्यत्र कुठेच दिसणार नाही.

त्यामुळेच आज गोवा सर्वच क्षेत्रांत अव्वल ठरत आहे. आपण मगो पक्षाशी जसे एकनिष्ठ राहिलो, तसेच इतर अनेक कार्यकर्तेही मगोशी निष्ठेने निगडित राहिले. या सर्व कार्यकर्त्यांच्या बळावर मगो पक्षाने यशाचे शिखर गाठले. आज तीच विजिगीषू वृत्ती युवा पिढीने दाखवावी आणि मगो पक्षाला गतवैभव प्राप्त करून द्यावे, असे आवाहन सुदिन ढवळीकर यांनी केले. यावेळी भाऊसाहेबांच्या पुतळ्याला उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

मगोपने नेते घडवले

मगो पक्षाने गोव्यात अनेक नेते घडवले, ज्यांनी गोवा घडवण्यासाठी प्रयत्न केले. मगो पक्षातून फारकत घेऊन प्रतापसिंह राणे आणि रवी नाईक हे गोव्याचे मुख्यमंत्री बनले. हे नेते मगोच्या मुशीतून घडले, ज्यांनी गोवा विकसित करण्यासाठी प्रयत्न केले. गोव्यात मगोला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी गोमंतकीयांनी कटिबद्ध व्हावे, असे आवाहन वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT