Mumbai Goa Highway Accident Dainik Gomantak
गोवा

Arambol Accident: रस्त्यावरच्या खड्ड्यात पडला स्कूटरस्वार! भटवाडी-हरमलमधील नागरिक संतप्त; 'रास्ता रोको'चा दिला इशारा

Bhatwadi Arambol Accident: सार्वजनिक बांधकाम खात्याकडून कोणतीच कृती होत नसल्याच्या निषेधार्थ भटवाडी - हरमल परिसरातील युवकांनी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.

Sameer Panditrao

Freak Accident Reported at Arambol Beach: भटवाडी येथील मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांत काल रात्री एक स्कूटरस्वार पडून जखमी होण्याची घटना घडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातील गुडघाभर पाण्यातून वाहने हाकणे कठीण होत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया वाहनचालक व्यक्त करीत आहेत.

या रस्त्याच्या दयनीय स्थितीबद्दल आवाज उठवून सार्वजनिक बांधकाम खात्याकडून कोणतीच कृती होत नसल्याच्या निषेधार्थ भटवाडी - हरमल परिसरातील युवकांनी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.

सोमवारी (ता. १५) रात्री ८ च्या सुमारास स्कूटर त्या धोकादायक खड्ड्यात गेल्याने तोल जाऊन स्कूटरस्वार पाण्यात पडला. दुर्दैवाने जायबंदी होण्याची वेळ त्याच्यावर आली. कंत्राटदाराच्या चुकीमुळे पाणी रस्त्यावर साचून राहत असल्याने रस्त्यानजीकच्या मातीचा भराव काढणे तसेच पाणी जाण्यासाठी छोटे साकव उपसणे आवश्यक असल्याचे मत वाहनचालक यशोधर पेडणेकर यांनी सांगितले.

कालच्या संततधार पावसामुळे या भागातून वाहने चालविणे जिकिरीचे झाले आहे. गेल्या आठवड्यात पंचायतीने या रस्त्यावरील मोठा खड्डा बुजवला होता. मात्र, बांधकाम खात्याचा हलगर्जीपणा जीवावर बेतण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.

दोन दिवसांत रस्ता वाहतुकीस सुरळीत न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याची गरज आहे, असे मत त्या वाड्यावरील युवकांनी संतापयुक्त सुरात व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT