Bharti Chodankar's house Dainik Gomantak
गोवा

Goa News: कामुर्लीत घराला आग लागल्याने लाखोंचे नुकसान; मोठी दुर्घटना टळली

भरवणवाडा-कामुर्ली येथील भारती चोडणकर यांच्या घराला आग लागून सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News: भरवणवाडा-कामुर्ली येथील भारती चोडणकर यांच्या घराला आग लागून सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले. तर, अग्निशमन दलाच्या जवानांना पाच लाखांची मालमत्ता वाचवण्यात यश आले.

मिळालेल्‍या माहितीनुसार, ही घटना सोमवारी पहाटे साडेपाचच्‍या सुमारास घडली. स्वयंपाक खोलीतील फ्रिजला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्यानंतर आगीने पेट घेतला. यात फ्रिजसह मिक्सर, ओव्हन, फॅन, दरवाजे, इतर विद्युत्त उपकरणे जळाली तर खिडक्यांची तावादनेही फुटली. पहाटे प्रिया चोडणकर या झोपेतून उठल्या तेव्हा घरात सर्वत्र धुराचे लोळ पसरलेले त्‍यांना दिसले.

स्वंयपाक खोलीत जाऊन पाहिले असता फ्रिज आगीत जळत होता. लगेच त्यांनी आपल्या मुलांना उठवले व त्यांना घरातून सुरक्षितस्थळी हलवले. नंतर शेजाऱ्यांना कल्पना देत म्‍हापसा (Mapusa) अग्निशमन दलाला पाचारण केले. दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीची झळ गॅस सिलिंडरला लागली नाही. त्‍यामुळे मोठी दुर्घटना टळली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT