Bharat Bandh has no response in Goa  Dainik Gomantak
गोवा

भारत बंदला गोव्यात प्रतिसाद नाही

गोव्यात आयटक या कामगार संघटनेने गोव्यात भारत बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते

दैनिक गोमन्तक

पणजी: देशातील शेतकरी संघटना व कामगार संघटना (Samyukta Kisan Morcha) यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज पुकारलेल्या देशव्यापी भारत बंदला (Bharat Bandh) गोव्यात (Goa) प्रतिसाद मिळाला नाही. गोव्यात आयटक या कामगार संघटनेने गोव्यात भारत बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. स्वतः आयटकने काही औद्योगिक वसाहतींच्या व काही खाण कंपन्‍यांच्या बाहेर कामगारांना घेऊन निदर्शने केली. हा अपवाद वगळता राज्यातील सर्वच शहरांतील जनजीवन सुरळीत सुरू होते.

बॅंक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष नाईक जॉर्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील बॅंका सुरू होत्या. मात्र, बॅंक कर्मचारी संघटनेचा भारत बंदला नैतिक पाठिंबा होता.

30 रोजी महामेळावा

भारत बंद आंदोलनाचा भाग म्हणून आयटकद्वारे 30 सप्टेंबर रोजी पणजी येथील आझाद मैदानावर सकाळी 10 वाजल्यापासून कामगार महामेळावा व धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

भारत बंद व गोवा

कामगार संघटनांनी देशव्यापी भारत बंदचे जे आवाहन केले, त्याला गोव्यात प्रतिसाद मिळाला नाही. बॅंकांसह सर्व व्यवहार व वाहतूकही सुरळीत सुरू होती. दिल्लीसह देशातील इतर राज्यांत या बंदला काही प्रमाणात प्रतिसाद मिळाला. गोव्यात कामगार संघटना तेवढ्या सक्रिय नाहीत. खाणी सुरू असताना जो आक्रमकपणा कामगार संघटना असलेल्या आयटकमध्ये होता तो सध्या दिसत नाही. काही उद्योगांतील कामगार आयटकशी संलग्न असले, तरी त्यांनीही काम सोडून बंदमध्ये सहभागी होण्यास नकार दिला. गोव्यात तसे बंद यशस्वी होणे कठीणच. कारण येथील लोक संपूर्ण विचार करूनच कुठल्याही गोष्टीला पाठिंबा देताना दिसतात.

संयुक्त किसान मोर्चाने (Samyukta Kisan Morcha) तीन कृषी कायद्यांच्या (Agriculture Bill) विरोधात काल भारत बंदची (Bharat Bandh) हाक दिली होती. या बंदला देशातील अनेक राजकीय पक्षांचा पाठिंबाही मिळाला होता. बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी स्पष्टपणे सांगितले होते की, आंदोलकांना दिल्लीत प्रवेश दिला जाणार नाही. एकीकडे शेतकरी (Farmers Protest) नेते सांगत होते की सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करावीत तर दुसरीकडे सरकारच्या बाजूने पुन्हा एकदा संवादाची दारे खुली होतील असेही सांगण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT