पेडणे येथे झालेल्या बाचाबाचीत काचा फोडलेली कार Dainik Gomantak
गोवा

महाराष्ट्रातील नोकरदारांवर संकट, चोर समजून गोव्यात बदडले

महाराष्ट्रातील नोकरदारांचे गोव्यात काय काम? : पेडणेत गैरसमजुतीमधून घडला प्रकार

Dainik Gomantak

Goa: सरमळे - पेडणे (Pernem) येथे काल रात्री 1 वाजण्याच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक विभाग, मुंबई (State Excise Squad, Mumbai) या पथकाला सरमळे पेडणे येथे 'चोर' असल्याच्या गैरसमजातून (Misconception of being a thief) लोकांकडुन मार खावा लागला. यात उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी व ग्रामस्थ यांमध्ये झालेल्या बाचाबाचीत कर्मचारी तसेच काही प्रमाणात ग्रामस्थ जखमी (Injured) झाल्याचे समजते.

सरमळे पेडणे येथे रात्री १वाजण्याच्या सुमारास स्थानीकांना MH 07 AV 7899 ही कार रस्त्याच्या बाजूला थांबविण्यात आली होती व त्यात काही व्यक्ती होत्या. मध्यरात्री मुख्य रस्त्यापासुन आत ही कार थांबविण्यात आल्याने गावातील लोकांना संशय आल्याने त्यांच्याकडे लोकांनी चौकशी केली असता, आपण सरकारी अधिकारी असल्याचे त्यांनी सांगितले. लोकांनी त्यांच्याकडे ओळखपत्र मागितले. परंतु संबंधित कर्मचाऱ्यांनी आयडी कार्ड दाखविण्यास असमर्थता दाखविली.

तसेच सरकारी अधिकारी असतील तर खाजगी कारमधून ते का आले ?त्यांच्या अंगावर गणवेश का नाही ? व इतक्या रात्री ते येथे का थांबले आहेत असे प्रश्न पडल्याने लोकांना ते चोर लुटारूं असल्याचा संशय आला, परिणामी ग्रामस्थ व त्या अधिकाऱ्यांत बाचाबाची झाली. त्यात लोकांनी याकारमधील लोकांना माराहण केली. यावेळी त्यांच्या कारच्या काचा फोडण्यात आल्या. पेडणे पोलीसांना याची माहीती मिळाल्यावर कारमधील लोकांना उपचारासाठी पेडणे इस्पितळात दाखल केले, तर त्यांची कार पोलीस ठाण्यावर नेण्यात आली. तर याप्रकरणी दोन स्थानीकांना ताब्यात घेण्यात आले.

या कारमध्ये एक लोखंडी रॉड असल्याचे आढळून आले. तर कारच्या क्रमांक पट्टीत खाडाखोड केल्याचे जाणवते. पोलीस चौकशी अंती मुंबई येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ते कर्मचारी असल्याचे स्पष्ट झाले.

गोवा राज्यात भरारी पथकाचे काम तरी काय?

राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक विभाग, मुंबई हे आयुक्त कांतीलाल उमप यांच्या मार्गदर्शनाखाली गोवा राज्यात तपासासाठी गेल्याचे बोलले जात आहे. मात्र असे असल्यास यावेळी कर्मचारी युनिफॉर्मवर होते का? तसेच कामावर असल्यास खाजगी गाडी घेऊन जाण्याचे कारण तरी काय? जर तपासणीसाठी गोवा राज्यात जाण्याचा आदेश होता तर त्या सीमेवरील कर्मचाऱ्यांना कोणत्याच कल्पना कशा देण्यात आल्या नव्हत्या? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कर्मचारी तसेच अधिकारी यांना कोणतीच कल्पना नसल्याचे पण यावेळी दिसून येत आहे. यावरून एक प्रश्न मात्र सर्वांच्या मनात निर्माण होत आहे तो म्हणजे आपल्या राज्याची हद्द सोडून गोवा राज्यात ह्या पथकाचे काम तरी काय, असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.

अज्ञात ग्रामस्थांन कडून गाडीची तोडफोड!

रात्री झालेल्या झटापटीत उत्पादन शुल्काचे कर्मचारी तसेच ग्रामस्थ जखमी झाल्याचे समजून आले आहे. यावेळी ग्रामस्थांच्या रोषाला उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी सापडले त्यात त्यांच्याकडे असलेली स्विफ्ट चारचाकीची तोडफोड अज्ञात ग्रामस्थांकडून करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT