Ravi Naik | Ashok Naik  Dainik Gomantak
गोवा

मंत्री रवी नाईक - अशोक नाईक आमनेसामने! भंडारी समाजातील नेत्यांमधील वाद चिघळला

Bhandari Samaj: अशोक गटाने फोंड्यात आयोजित केलेली बैठक आणि निवडणुकीला न्यायालयातून स्थगिती मिळविल्यानंतर वाद उफाळला

गोमन्तक डिजिटल टीम

Bhandari Samaj Goa

पणजी: गोमंतक भंडारी समाजाची केंद्रीय कार्यकारिणी समिती आणि या समितीच्या विरोधातील नेत्यांमधील वाद आता उफाळला आहे. समितीच्या अशोक गटाने फोंड्यात आयोजित केलेली बैठक आणि निवडणुकीला न्यायालयातून स्थगिती मिळविल्यानंतर हा वाद अधिकच चिघळला आहे.

मंत्री रवी नाईक यांचा अशोक नाईक विरोधी गटाला पाठिंबा असल्याने पणजी पोलिसांमध्ये अशोक नाईक व इतरांवर वर्षापूर्वी नोंद झालेल्या तक्रारीच्या चौकशीला अचानक वेग आला आहे. त्यामुळे गोमंतक भंडारी समाजामध्ये गटबाजी सुरू होऊन त्याला राजकीय वळण लागले आहे.

भंडारी समाजात दोन गट आहेत. समाज अध्यक्ष अशोक नाईक यांच्या गटाविरोधातील उपेंद्र गावकर यांनी समाजाची बैठक बोलावून निवडणूक घेण्याची नोटीस जाहीर केली. त्याला आव्हान देऊन नाईक यांच्या गटाने न्यायालयाकडून स्थगिती मिळवली होती.

मात्र, ही बैठक न घेता स्नेहमेळावा आयोजित केला व त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला होता. या स्नेहमेळाव्याला समाजाचे मंत्री रवी नाईक तसेच आजी-माजी आमदारही उपस्थित राहिले होते.

म्हापसा येथील बोडगेश्‍वर मंदिरानजीक असलेली गोमंतक क्षत्रिय भंडारी समाजाची मालमत्ता गैरप्रकारे गोमंतक भंडारी समाजाच्या नावे नोंद केल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी अशोक नाईक यांच्यासह ५ जणांच्या जबान्या नोंद केल्या.

त्यांना पुन्हा गरज भासेल तेव्हा चौकशीसाठी बोलावण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. या पाचजणांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जावरील सुनावणीवेळी न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन दिला आहे.

गोमंतक भंडारी समाजाचे पदाधिकारी अशोक नाईक, देवानंद नाईक, कृष्णकांत गोवेकर, झोगसू नाईक, फक्रू नाईक व इतरांनी गैरप्रकारे गोमंतक क्षत्रिय भंडारी समाजाची मालमत्ता संस्थेच्या नावावर केल्याची तक्रार अनिश बकाल आणि अतिश मांद्रेकर यांनी दाखल केली होती. पोलिसांनी त्याची दखल न घेतल्याने तक्रारदारांनी न्यायालयात धाव घेतली होती.

गेल्या वर्षी न्यायालयाने ती दाखल करून घेऊन चौकशीचे आदेश पणजी पोलिसांना दिले होते.

त्यानुसार गेल्या वर्षी पोलिसांनी पदाधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. काही दिवसांपूर्वी या पदाधिकाऱ्यांना पणजी पोलिसांकडून चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे समन्स पाठवले असता, त्या पाचहीजणांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. तक्रार दाखल होऊन वर्ष उलटून गेले आहे. त्यामुळे त्यांना लगेच अटक होण्याची शक्यताही नाही.

अशोक नाईक यांना समन्स

गावकर गटाच्या बैठकीला स्थगिती आणल्याने पणजी पोलिसांत समाजाच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध दाखल असलेली व गेले वर्षभर कोणत्याही चौकशीविना धूळ खात पडून असलेल्या तक्रारीच्या चौकशीला वेग आला आहे. अशोक नाईक व इतर चौघांना पोलिसांनी समन्स बजावून चौकशीस बोलावले होते.

कोर्टात अंतरिम जामीन मंजूर

या प्रकरणात पोलिसांना तपास करण्यास पुरेसा वेळ मिळाला आहे तसेच अर्जदारांना यापूर्वी पोलिसांनी बोलावले तेव्हा ते उपस्थित राहिले आहेत. भंडारी समाजाविरुद्ध दिवाणी खटलाही सुरू आहे. त्यामुळे त्यांना अंतरिम जामीन देण्यात येत असून अर्जदार चौकशीसाठी उपस्थित राहू शकतात, असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT