Goa kala Academy Bhajan Krishna Salkar  Dainik Gomantak
गोवा

Bhajan Competition: भजन ही गोव्याची ओळख; आमदार कृष्णा साळकर

Kala Academy : कला अकादमीच्या केंद्र क्र. १ वरील भजन स्पर्धेस प्रारंभ

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा ही कलाकारांची खाण आहे. या मातीत अनेक बहुमूल्य असे कलाकार रुजलेले आहेत. कलकारांना वाव देण्यासाठी कला अकादमी सदैव तत्पर आहे. भजनी कला टीकवून ठेवण्याचे काम गेल्या ५० वर्षापासून कला अकादमी करत आली आहे. भजन ही गोव्याची ओळख आहे. ही संस्कृती टीकवून ठेवण्याचे महान कार्य कला अकादमी करत आहे, असे प्रतिपादन आमदार कृष्णा (दाजी) साळकर यांनी केले.

सोमवारपासून कला अकादमी आयोजित पं. मनोहरबुवा शिरगांवकर स्मृती विभागीय स्तरावरील भजन स्पर्धेला रवींद्र भवन, बायणा येथून प्रारंभ झाला. या केंद्र क्र. १ वरील स्पर्धेचा शुभारंभ आमदार कृष्णा साळकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी कला अकादमीचे कार्यक्रम विकास अधिकारी प्रदीप गांवकर, रवींद्र भवन बायणाचे अध्यक्ष जयंत जाधव, परीक्षक दत्तू गावस, प्रसाद कळंगूटकर, गोकुळदास गावणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

साळकर पुढे म्हणाले की, भजन संस्कृती देवाकडे संवाद, भक्ती साधण्यासाठी उत्तम साधन आहे. ही आपली संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी पुरुषांबरोबर महिलांचाही तितकाच मोठा सहभाग आहे. ताण तणाव हा मनुष्याचा अविभाज्य भाग आहे. तो दूर करण्यासाठी भजन हे उत्तम साधन आहे. आपली भजन संस्कृती टीकवून ठेवण्यासाठी प्रत्येकांनी सदैव पुढे यावे, असे आवाहन केले.

स्पर्धेचा शुभारंभ महिला कलाकारांच्या सादरीकरणाने झाला. पहिल्या सत्रात रुमडेश्वर दत्तात्रय सांस्कृतिक महिला मंडळ (रुमडावाडा), शिव समर्थ सांस्कृतिक मंडळ (वास्को), श्री तिरुपती बालाजी सांस्कृतिक संस्था (हेडलॅण्ड सडा), श्री ऋषी दत्तात्रय महिला भजनी मंडळ (ओरुले वास्को), स्वरब्रह्म संगीत सांस्कृतिक संस्थान (एलमोन्त), श्री दामोदर महिला भजनी मंडळ (मुर्डी, कासावली), गजानन भोगदेश्वर महिला भजनी मंडळ (बोगदा), श्री सातेरी महिला भजनी मंडळ (शिंदोळी, सांखवाळ) व श्री हनुमान महिला भजनी संस्कृत संस्था (नॉन मॉन-वास्को) ही पथके सहभागी झाली.

कार्यक्रम विकास अधिकारी प्रदीप गावकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जयंत जाधव यांचेही समयोचित भाषण झाले. सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी संजीव झर्मेकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT