Canacona Dainik Gomantak
गोवा

Birsa Munda Jayanti: काणकोणनगरी दुमदुमली! भगवान बिरसा मुंडा शोभायात्रेचा समारोप; 4000 महिलांचा सहभाग

Birsa Munda Jayanti Canacona: शोभायात्रेत स्थानिक दिंडी पथक, मुरगाव येथील श्री दामोदर बोडगेश्‍‍वर दिंडी पथकाने सुमारे अर्धा किलोमीटर आपल्या कलेचा आविष्कार घडविला.

गोमन्तक डिजिटल टीम

काणकोण : भगवान बिरसा मुंडा यांच्या शंभराव्या जयंतीचा थांगपत्ता त्यावेळच्या सरकारला नव्हता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार केंद्रात आले आणि आदिवासी समाजाने देशासाठी दिलेले योगदान अधोरेखित झाले, असे प्रतिपादन माजी केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री डॉ. भारती पाटील यांनी केले.

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५०व्‍या जयंतीनिमित्त काणकोणमध्ये आयोजित शोभायात्रेच्‍या समारोप कार्यक्रमात पाटील प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. बिरसा मुंडा व अन्य आदिवासी क्रांतिकारकांची माहिती अद्याप प्रकाशात आलेली नाही. युवा पिढीने या क्रांतिकारकांचा अभ्यास करून माहितीचा खजिना निर्माण करणे गरजेचे आहे, असे पाटील म्‍हणाल्‍या.

आदिवासी कल्याणमंत्री रमेश तवडकर यांनी सांगितले की, बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचे आदर्श दैवत आहे. यावेळी आदिवासी कल्याण खात्यातर्फे ‘नीट’ व अन्य स्पर्धात्मक परीक्षांसाठी आर्थिक मदत करण्याकरीता ‘लक्ष्य-सिद्धी’ योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. त्याचप्रमाणे ‘श्रमधाम’ योजेनेत विशेष योगदान दिलेल्या वॉरियर्सचा गौरव करण्यात आला.

सुमारे चार हजार महिलांचा सहभाग

शोभायात्रेत स्थानिक दिंडी पथक, मुरगाव येथील श्री दामोदर बोडगेश्‍‍वर दिंडी पथकाने सुमारे अर्धा किलोमीटर आपल्या कलेचा आविष्कार घडविला. यावेळी व्यासपीठावर आदिवासी कल्याण खात्याचे संचालक नीलेश धायमोडकर, कला अकादमीचे अध्यक्ष चंद्रकांत कवळेकर, दक्षिण गोवा भाजप अध्यक्ष प्रभाकर गावकर, नगराध्यक्ष लक्ष्मण पागी, प्रभाकर गावकर, रमाकांत नाईक गावकर व मान्‍यवर उपस्थित होते. गायतोंडे मैदानापासून सुरू झालेल्या या शोभायात्रेत सुमारे चार हजार महिला सहभागी झाल्‍या होत्‍या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: 'ही दुर्घटना म्हणजे भाजप सरकारच्या भ्रष्ट व्यवस्थेने घेतलेले बळी'! हडफडे अग्नितांडवावरून विरोधकांचा हल्लाबोल

IndiGo Flights Update: ‘इंडिगो’ची गोव्यातून 10 विमाने रद्द! सेवा हळहळू रुळावर; प्राधिकरणाने छायाचित्रे केली Viral

Goa Politics: ..अखेर ‘आरजीपी’ची वेगळी चूल! काँग्रेससोबत न जाण्‍याचा निर्णय; 28 उमेदवारांचा प्रचार सुरू

Arpora: 'मला पोलिसांनी मंदिरातून उचलले'! हडफडेचे सरपंच कारवाईमुळे संतप्त; भाजपचा पराभव करण्यासाठी प्रयत्न करण्याचे केले सूतोवाच

Super Cup 2025: जल्लोष! FC Goa सुपरडुपर हिट; सलग दुसऱ्यांदा जिंकला कप, अनेक विक्रमांना गवसणी

SCROLL FOR NEXT