Bhago Varak Goa Panchayat Election  Dainik Gomantak
गोवा

Goa Panchayat Election : वन-म्हावळिंगेतून 82 वर्षांची ‘पगडी’ भारी

विजयाची चर्चा : ज्येष्ठ भागो वरक यांचे पंचायत निवडणुकीतून राजकीय पुनरागमन

दैनिक गोमन्तक

Goa Panchayat Election : डिचोली तालुक्यातील काही पंचायतींचा धक्कादायक निकाल लागला असतानाच, सर्वत्र चर्चा आहे आणखीन एका गोष्टीची. वन-म्हावळिंगे पंचायतींतून ८२ वर्षांची ‘पगडी’ भारी ठरली आहे. पंचायतीच्या प्रभाग सहामधून ‘पगडी’ या टोपणनावाने परिचित असलेले 82 वर्षांचे वृद्ध भागो भैरो वरक हे विजयी झालेत.

भागो वरक यांच्या विरोधात अन्य तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. भागो यांना दोनशे तर त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी शाहू वरक यांना 149 मते मिळाली. भागो वरक हे तब्बल 50 मतांनी विजयी झाले. दरम्यान, निवडून आल्यानंतर भागो वरक यांनी आपल्या समर्थकांसमवेत विजयोत्सव साजरा केला. त्यांच्या विजयी मिरवणुकीत युवक सहभागी झाले होते. तालुक्यात निवडून आलेल्या पंचसदस्यांपैकी ते सगळ्यात ज्येष्ठ पंच ठरले.

..यामुळे टोपणनावाने परिचित

धनगर समाजातील नेते असलेले भागो वरक हे विशिष्ट पद्धतीच्या ‘पगडी’ मुळे प्रकाशझोतात आहेत. त्यांच्या डोक्यावर कायम पगडी असते. केवळ डिचोलीतच नव्हे, तर बहूतेक भागात ते ‘पगडी’ या नावानेच परिचित आहेत. 1998 साली झालेल्या पंचायत निवडणुकीत ते वन-म्हावळींगे पंचायतीवर निवडून आले होते. मात्र, नंतर ते पंचायत राजकारणापासून अलिप्त होते.

दरम्यान आपण केलेली कामे पाहून धनगर बांधवांसह अन्य मतदारांनी पुन्हा निवडणूक लढविण्याचा हट्ट धरला होता. त्यामुळेच निवडणुकीच्या रिंगणात उतरलो. पंच असताना आपल्या प्रभागाचा केलेला विकास सर्वांच्या नजरेत आहे. त्यामुळेच मतदारांनी भरघोस मतांनी निवडून दिले. आपण पंचायतीच्या विकासासाठी कार्यरत राहू, असा विश्वास भागो वरक यांनी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT