आगरवाडा चोपडे पंचायतीच्या सरपंच पदी भगीरथ पंढरीनाथ गावकर यांची बिनविरोध निवड  Dainik Gomantak
गोवा

आगरवाडा चोपडे पंचायतीच्या सरपंच पदी भगीरथ पंढरीनाथ गावकर यांची बिनविरोध निवड

आगरवाडाचोपडे (AGARWADA CHOPDE) पंचायतीच्या सरपंच पदी श्री भगीरथ पंढरीनाथ गावकर यांची आज बिनविरोध निवड झाली.

दैनिक गोमन्तक

मोरजी: आगरवाडा चोपडे (AGARWADA CHOPDE) पंचायतीच्या सरपंच पदी श्री भगीरथ पंढरीनाथ गावकर यांची आज बिनविरोध निवड झाली.सरपंच सौ. प्रमोदीनी आगरवाडेकर अलिखित करारानुसार सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते.त्यासाठी सोमवार २७ रोजी निवडणूक घेण्यात आली.

उपसरपंच सौ. समिता सिताराम राऊत यांनी पंच श्री भगीरथ पंढरीनाथ गावकर यांचे नाव सरपंच पदासाठी सुचवले त्यांना माजी सरपंच सौ.प्रमोदीनी प्रमोद राऊत यांनी अनुमोदन दिले. सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने निर्वाचन अधिकारी श्री फटुसिंग शेटगावकर यांनी निर्धारित वेळे नंतर श्री भगीरथ पंढरीनाथ गावकर यांची सरपंच म्हणून निवड घोषित केली.

पंचायत सचिव रमेश मांद्रेकर यांनी त्यांना सहाय्य केले..आज सोमवारी सकाळी पंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीला उपसरपंच सौ. समिता राऊत,माजी सरपंच सौ. प्रमोदिनी आगरवाडेकर ,सौ.संगीता नाईक ,पंच भगीरथ गावकर,प्रमोद गावकर,नितीन चोपडेकर ,सौ. नीलम अनिल शेट्ये मसुरकर आदी सातही पंच उपस्थित होते.

श्री भगीरथ गावकर यांची सरपंच पदी निवड झाल्याबद्दल श्री आमदार दयानंद सोपंटे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

0927 आगरवाडाचोपडे

आगरवाडा चोपडेच्या सरपंच पदी बिनविरोध निवड झाल्यानंतर श्री भगीरथ गावकर,उपसरपंच सौ. समिता राऊत,माजी सरपंच तथा विद्यमान पंच सौ. प्रमोदीनी आगर वाडेकर,सौ संगीता नाईक,सौ.नीलम शेट्ये मसुरकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT