LPG Theft Dainik Gomantak
गोवा

LPG Theft: सावधान...गॅस सिलेंडरची 'अशी' होतेय चोरी, कळंगुटमधील घटनेने खळबळ

कळंगुट स्थानिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली

गोमन्तक डिजिटल टीम

LPG Theft तुमच्या घरी येणाऱ्या गॅस सिलिंडरमधून गॅसची कशी चोरी होतेय असं जर कुणी तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुम्ही त्यावर विश्वास ठेवणार नाही. पण या संबंधीची घटना नुकतीच कळंगुट येथे घडलीय. कळंगुट मधील स्थानिकांच्या सतर्कतेने एक मोठी घटना उघडकीस आली आहे.

कळंगुट येथे गॅस सिलिंडर पुरवठा करणारा टेम्पो उभा होता. या ट्रकमधून अचानक मोठा स्फोट सदृश्य आवाज आल्याने तेथील स्थानिकांनी टेम्पोजवळ धाव घेतली. त्या टेम्पोमध्ये दोघे जण पाइपमधून एका सिलिंडरातील गॅस दुसऱ्या सिलिंडरमध्ये ट्रान्सफर करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

आपले कृत्य स्थानिकांना समजल्याने त्यांच्या लक्षात येताच त्यांनी सिलिंडरने भरलेली गाडी घटनास्थळी टाकून पळ काढला. खरं तर गॅसचोरी करणाऱ्यांचं हे कृत्य जीवघेणं देखील ठरू शकलं असतं.

कारण गॅसचोरी करताना तिथं स्फोट होण्याची देखील भीती होती. पण स्थानिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. दरम्यान या घटनेची खबर पोलिसांना देण्यात आल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सदर टेम्पो पोलीस स्टेशनमध्ये नेत चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा पोलिसांनी मिळवून दिला रशियन पर्यटकाचा हरवलेला पासपोर्ट

Saint Francis Xavier Exposition: नोव्हेनाच्या पहिल्याच दिवशी अलोट गर्दी! जुने गोवेत 1 लाख भाविक; अजून आकडा वाढणार

Ranbir Kapoor At IFFI: 'मला चित्रपट दिग्दर्शक व्हायचंय पण..'; रणबीरने व्यक्त केली महत्वाकांक्षा; प्रेक्षकांना दिली खूशखबर

Goa Fianance Scam: गोव्यात आजवरचा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा; गुंतवणुकीच्या नावाखाली 50 जणांना 130 कोटींचा गंडा

Mayem Fire Incident: वायंगिणी-मयेत आगीचा तांडव! 30 लाख रुपयांचे नुकसान; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT