Betul Fort  Dainik Gomantak
गोवा

Quepem News : बेतूल किल्ला बनणार उत्तम पर्यटनस्थळ ; हवी फक्त इच्‍छाशक्ती

गोमन्तक डिजिटल टीम

Quepem News : केपे : जो प्रदेश आपला इतिहास विसरतो, ज्या प्रदेशाला आपल्या ऐतिहासिक स्थळाची जपणूक करता येत नाही व जो इतिहास कालच्या स्मृती जागवत नाही, तो प्रदेश जीवनहिन व भावनाहिन मूक प्रदेश असतो, असे मत जाणकार व्यक्त करतात.

गोव्यात अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत, ज्यांचे योग्य संगोपन व रक्षण न केल्यामुळे ऐतिहासिक मूल्य हरपले आहे. कालचा इतिहासाची कथा सांगणारे पुरावे आज नष्‍ट झाले आहेत. असाच कालपर्यंत गडद जंगलात लपलेला बेतूल किल्ला अकस्मात प्रकाशझोतात आला आहे.

काही इतिहास संशोधक या किल्ल्याचा शोध आपण लावल्याचा दावा करीत असेल तरी या ठिकाणी छ्त्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे हे स्थानिकांना आधीपासून माहीत होते. मात्र किल्याचे ऐतिहासिक महत्त्‍व स्थानिकांना न कळल्यामुळे हा किल्ला अनेक वर्षे अडगळीत राहिला.

या किल्यावर पूर्वी शिवजयंती साजरी केली जायची. मात्र सरकारचे व पुरातत्व खात्याचे लक्ष या किल्याकडे जाण्यास बराच काळ लागला. पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई हे छ्त्रपती शिवाजी महाराजांचे भक्त.

त्‍यांच्या प्रयत्नाने सरकारने यंदा या किल्यावर भव्य शिवजयंती साजरी केली. छ्त्रपती राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने सरकारने तेथे कार्यक्रम सादर करून सगळ्यांच्या नजरा किल्याकडे वळविल्‍या.

बेतूल किल्ला अरबी समुद्राला तोंड करून निर्माण केला होता. इतिहास सांगतो की, १६७९ साली छ्त्रपती शिवाजी महाराजांनी बाळ्‍ळी महालाच्‍या हवालदाराकडून या किल्ल्याची उभारणी करून घेतली. समुद्रीमार्गाने येणाऱ्या शत्रूवर नजर ठेवण्यासाठी हा किल्ला उभारला होता.

पोर्तुगिजांच्या आगमनानंतर या किल्ल्याचा ताबा त्‍यांच्‍याकडे गेला. त्‍यांनी आपली सागरी सुरक्षा इतरत्र केंद्रित केल्याने या किल्याकडे आडनजर झाली व हळूहळू तो विस्मृतीत गेला होता.

खळखळणारा समुद्र, साळ नदी अन्‌ हिरवीगार वनराई

या ऐतहासिक स्थळाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास साधणे शक्य आहे. समुद्रात पाय सोडून उभा असलेल्या या बेतूल किल्याचे मनोहारी दृश्य पर्यटकांना आकर्षित करण्‍यासारखे आहे.

खळखळणारा समुद्र, जवळच साळ नदी व हिरवीगार वनराई. या किल्यावर साधनसुविधा उपलब्ध केल्यास पुन्हा तो प्रसिद्धीस येणार यात शंकाच नाही.

किल्‍ल्याचे ऐतिहासिक महत्त्व सांभाळून पर्यटनाच्‍या दृष्टीने विकास शक्य झाल्यास ते ‘सोने पे सुहागा’ म्हणावे लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT