Share Trading Scam Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: शेअर ट्रेडिंग ॲपवरून 2.5 कोटीची फसवणूक, ज्यादा मोबदल्याच्या आमिषापोटी बसला फटका; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Betki Khandola Share Trading Scam: शेअर ट्रेडिंगमध्ये जादा मोबदला देण्याच्या आमिषाला बळी पडल्याने बेतकी-खांडोळा येथील एकाला तब्बल अडीच कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

Sameer Panditrao

Betki-Khandola financial fraud

फोंडा: शेअर ट्रेडिंगमध्ये जादा मोबदला देण्याच्या आमिषाला बळी पडल्याने बेतकी-खांडोळा येथील एकाला तब्बल अडीच कोटी रुपयांचा फटका बसला आहे. याप्रकरणी सायबर शाखेने अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी सुरू आहे.

बेतकी-खांडोळा येथील एका व्यक्तीला हा फटका बसला असून पैशांचा हा व्यवहार गेल्या २५ नोव्हेंबर २०२४ ते ७ जानेवारी २०२५ या काळात झाला आहे. संबंधिताने सायबर गुन्हा शाखेत तक्रार दाखल केली आहे.

बेतकी-खांडोळा येथील या इसमाला अज्ञात व्यक्तीने व्हॉटस्ॲप मोबाईल, फेसबूक तसेच इतर माध्यमांद्वारे संपर्क साधला आणि शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास भरपूर मोबदला मिळेल याची ग्वाही दिली. जादा पैशांच्या मोबदल्याच्या आमिषाला बळी पडलेल्या बेतकी-खांडोळा येथील या इसमाला अज्ञात व्यक्तीने शेअर ट्रेडिंगसाठी लिंक पाठवले. या लिंकद्वारे खात्री पटवण्यात आल्यानंतर शेअर ट्रेडिंग ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले आणि या ॲपद्वारे वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे भरण्यास सांगण्यात आले.

बेतकी-खांडोळा येथील त्याने आपल्या खात्यातील पैसे विविध बँक खात्यात जमा केले. सुमारे २ कोटी ४४ लाख रुपये विविध बँक खात्यात जमा करण्यात आले. हा व्यवहार गेल्या ७जानेवारीपर्यंत चालला होता. मात्र शंका आल्यानंतर बेतकी-खांडोळा येथील त्या इसमाने सायबर गुन्हा विभागात धाव घेतल्यावर ‘त्या’ ठकसेनाने लिंक आणि ॲप दोन्ही ब्लॉक करण्यात आली. सध्या सायबर गुन्हा विभागात ही तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील चौकशी सुरूआहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT