Bethora Thar Jeep fire Incident Dainik Gomantak
गोवा

Bethora Fire Incident: बघता बघता कारने घेतला पेट! दत्तगड-बेतोड्यात जीप जळून खाक, 22 लाखांचे नुकसान

Bethora Thar Jeep fire Incident: दत्तगड - बेतोडा येथे सोमवारी मध्यरात्री २.२० वाजण्याच्या सुमारास घराच्या जवळ पार्क केलेली थार जीपला शॉट सर्कीट मुळे आग लागली.

Sameer Panditrao

Bethora Thar Jeep fire News

फोंडा: दत्तगड - बेतोडा येथे सोमवारी मध्यरात्री २.२० वाजण्याच्या सुमारास घराच्या जवळ पार्क केलेली थार जीपला शॉट सर्कीट मुळे आग लागली. दीड वर्षांपूर्वी घेतलेली थार जीप संपूर्ण जळून खाक झाली असून अंदाजे २० ते २२ लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा दावा थार जीप मालक इम्रान झालेकर यांनी केला आहे.

झालेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार (जीए-०९, डी -८७६१) ही थार जीप सोमवारी रात्री ९.३० वाजता घराजवळ पार्क करून ठेवली होती. पण रात्री २-२० वाजण्याच्या सुमारास थार जीप गाडीत शॉर्ट सर्कीट झाले व आगीने पेट घेतला. अचानक जीपचा टायर फुटल्याचा मोठा आवाज आल्याने या वस्तीतील लोकांनी बाहेर येऊन पाहिले असता थार जीप पूर्ण आगीच्या विळख्यात होती. संपूर्ण कारने पेट घेतला होता.

आगीची झळ घरांच्या बाजूला असलेल्या वातानुकूलित यंत्राला लागली व हे यंत्रही जळून खाक झाले आहे. घरातील तसेच स्थानिक लोकांनी त्वरित अग्निशमन दलाच्या कार्यालयात दूरध्वनीवरुन माहिती दिल्यावर अग्नीशामन दलाच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी येऊन आग विझविली. घरा शेजारच्या घरांची दारे, तसेच घरातील वस्तु, वातानकुलीत यंत्र व थार जीप मिळून अंदाजे २२ लाखांचे नुकसान झाल्याचे इम्रान झालेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT