पणजी: पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेला गोवा देश-विदेशातील पर्यटकांना भुरळ पाडतो. दरवर्षी मोठ्यासंख्येने पर्यटक गोव्याला भेट देतात. कोणी येथे गोव्याचं निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी तर कोणी येथील नितळ समुद्रकिनारे पाहण्यासाठी येतात. आज (17 मे) आपण या लेखाच्या माध्यमातून गोव्यातील प्रसिद्ध ठिकाणे, खाद्यसंस्कृती त्याचबरोबर गोव्यात आल्यानंतर कुठे फिरण्याचा प्लॅन बनवाल अशा अनेक गोष्टींविषयी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत.
काजू
गोवा काजूसाठी प्रसिद्ध आहे. येथील काजू स्वादिष्ट आणि दर्जेदार मानले जातात. हिवाळ्याच्या शेवटच्या महिन्यांपासून उन्हाळ्याच्या सुरुवातीपर्यंत काजूचा हंगाम चालू असतो.
फेणी
काजूपासून बनवलेले गोव्यातील पारंपरिक पेय म्हणजे फेणी. हे काही खास स्थानिक रेस्टॉरंट्स तसेच दुकानांमध्ये सहज मिळते.
गोव्याची (Goa) एक वेगळी ओळख म्हणजे समुद्रकिनाऱ्यांवर मिळणाऱ्या नैसर्गिक शंख आणि शिंपल्यांचा वापर करुन बनवलेले दागिने, तसेच हस्तकलेच्या वस्तू. पणजी, हणजूण, म्हापसा या बाजारांत तुम्हाला रंगबेरंगी, सुंदर आणि पारंपरिक डिझाईनचे दागिने तसेच घरगुती सजावटीसाठी वस्तू मिळतील.
गोव्याच्या पारंपरिक पाककृतींसाठी वापरले जाणारे मसालेही खूप प्रसिद्ध आहेत. गोव्यातील मसाल्यांचे मळे पाहण्यासाठी पर्यटक मोठ्याप्रमाणात येतात. स्थानिक लोक बाजारात मसाले पॅक करुन विकतात.
हणजूण, म्हापसा आणि पणजी या ठिकाणी पारंपरिक, हाताने रंगवलेले, छान डिझाईन असलेले कपडे तसेच बॅग्ज सहज उपलब्ध होतात. या वस्तू गोव्याला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी एक खास आठवणी ठरतात.
गोव्यातील सर्वात प्रसिद्ध फळ म्हणजे काजू (Cashew). काजूचा हंगाम हिवाळ्याच्या शेवटी आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला असतो, त्यामुळे या काळात काजूची खरेदी करणे योग्य ठरते.
गोवा सफरीचा आनंद लुटण्यासाठी 2 दिवस पुरेसे असले तरी, आरामात गोवा अनुभवण्यासाठी 3 ते 5 दिवसांचा प्लॅन तुम्ही केला पाहिजे. या प्लॅनमध्ये तुम्ही गोव्यातील समुद्रकिनारे, सांस्कृतिक स्थळे, बाजारपेठा आणि निसर्ग सौंदर्य अनुभवू शकता.
उत्तर गोवा (बागा, कळंगुट, हणजूण): नाईट पार्टीसाठी हे समुद्रकिनारे प्रसिद्ध आहेत.
दक्षिण गोवा (पारोळे, कार्बे-द-राम ): नैसर्गिक सौंदर्य आणि शांतता ही समुद्रकिनाऱ्यांची खासियत आहे.
पणजी: राज्याच्या मध्यभागी असून सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठिकाणे पाहण्यासाठी प्रसिद्ध.
रहाण्याचे पर्याय: हॉटेल, रिसॉर्ट्स, होमस्टे, बीच शॅक्स- सर्व बजेटसाठी पर्याय उपलब्ध.
पहिला दिवस:
सकाळी: बागा किंवा कळंगुट समुद्रकिनाऱ्याची सफर
दुपारी: अग्वाद किल्ला आणि सेंट लॉरेन्स चर्च
संध्याकाळी: मांडवी नदीच्या किनारी सनसेट
दुसरा दिवस:
सकाळी: पणजीतील मिरामार बीच आणि चर्चेस भेट
दुपारी: दोनापावला व्ह्यू पॉइंट
संध्याकाळी: नाईट मार्केट किंवा क्लबमध्ये एन्जॉय
नोव्हेंबर ते फेब्रुवारी: पर्यटन हंगाम, हवामान आल्हाददायक
डिसेंबर: ख्रिसमस आणि न्यू ईयरचे जंगी सेलिब्रेशन
जुलै-ऑगस्ट (मान्सून): हिरवळ आणि नैसर्गिक सौंदर्य अनुभवण्यास उत्तम, पण समुद्रकिनाऱ्यावर अॅक्टिव्हिटीज मर्यादित
टीटोज् लेन (बागा) : गोव्यातील प्रसिद्ध पार्टी स्ट्रीट
मांडवी क्रूझ (पणजी) : लाईव्ह म्युझिकसह नदीवरील सफर
कॅसिनो क्रूझ: Deltin Royale, Casino Pride रात्रीचे खास आकर्षण
नाईट मार्केट (सफारी नाईट मार्केट, हणजूण): शॉपिंग, फूड, लाईव्ह परफॉर्मन्सेसचा आनंद
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.