Bangalore charitable trust fraud 6.3 crore Dainik Gomantak
गोवा

6.30 कोटींची फसवणूक; संशयित दोडामार्गात जेरबंद, बंगळुरू पोलिसांच्या तावडीतून झालेला फरार; इको-फार्ममधून ताब्यात

Gagan Deep N arrest Goa: ६.३० कोटी रुपयांची फसवणूक करून पोलिसांच्या तावडीतून पसार झालेल्या संशयित गगन दीप एन. (३२, चिकबळ्ळापूर-कर्नाटक) याला पकडण्यात पणजी कोस्टल सिक्युरिटी पोलिसांना यश आले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: बंगळुरू येथील एका चॅरिटेबल ट्रस्टची ६.३० कोटी रुपयांची फसवणूक करून पोलिसांच्या तावडीतून पसार झालेल्या संशयित गगन दीप एन. (३२, चिकबळ्ळापूर-कर्नाटक) याला पकडण्यात पणजी कोस्टल सिक्युरिटी पोलिसांना यश आले आहे. संशयिताला दोडामार्ग येथील एका इको-फार्ममधून ताब्यात घेण्यात आले.

संशयित गगन दीप याने एका नामांकित कंपनीचा अधिकारी असल्याचे भासवून बंगळुरू येथील एका ट्रस्टची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी ३१ मार्च २०२६ रोजी बंगळुरू पोलिसांनी त्याला अटक केली होती. फसवणुकीच्या रकमेतील काही भाग संशयिताने गोव्यातील कॅसिनोमध्ये खर्च केल्याची माहिती समोर आल्यानंतर, वसुलीसाठी बंगळुरू पोलिस ३ एप्रिल रोजी त्याला घेऊन गोव्यात आले होते.

४ एप्रिलच्या रात्री पणजी येथील एका कॅसिनोमध्ये तपास सुरू असताना, गर्दीचा फायदा घेऊन गगन दीप याने पोलिसांना धक्का दिला आणि तिथून पळ काढला. याप्रकरणी देवनहळ्ळी पोलिस ठाण्याचे निरीक्षक राकेश सी. यांच्या तक्रारीवरून पणजी कोस्टल पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलमान्वये गुन्हा नोंद केला होता.

पणजी कोस्टल पोलिसांची कारवाई

ही कारवाई पणजी कोस्टल पोलिस ठाण्याचे निरीक्षक सजीत पिल्लई यांच्या नेतृत्वाखाली एएसआय कार्लोस पाँटेस, हवालदार सूर्यकांत बोर्डेकर, पोलिस कॉन्स्टेबल लक्ष्मण कौठणकर आणि राजेश म्हार्दोळकर यांनी केली. या कारवाईसाठी पोलिस अधीक्षक रॉय परेरा आणि कोस्टल सिक्युरिटीचे पोलिस अधीक्षक राजेश कुमार यांचे मार्गदर्शन लाभले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"त्या 15 वर्षांच्या मुलीच्या वेदनांची कल्पना करा!" सरन्यायाधीश सूर्यकांत भावूक; अत्याचार पीडितेचा गर्भपात रोखण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं धुडकावली

Water Standards Goa: नळातून शुद्धच पाणी यावे! - संपादकीय

VIDEO: "भारत आयटीसाठी तर पाकिस्तान दहशतवादासाठी ओळखला जातो", राजनाथ सिंह यांनी पाकड्यांचा पुन्हा फाडला बुरखा; 'ऑपरेशन सिंदूर'बाबत मोठा खुलासा

खरी कुजबुज: विषारी कचऱ्यातून मिळणार मुक्ती!

Viral Video: 'दुचाकी की चालतं-फिरतं मृत्यूचं जाळं', चिमुकल्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या बापाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी सुनावले खडे बोल

SCROLL FOR NEXT