Benaulim  Dainik Gomantak
गोवा

Benaulim News : ‘बाणावली’मध्ये आलेमाव कुटुंबाच्या लोकप्रियतेत घट?

Benaulim News : या निवडणुकीत चर्चिल आपण कुणालाच पाठिंबा दिला नाही, असे जरी म्‍हणत असले तरी त्‍यांचे पुत्र सावियो यांनी ग्रेफन्‍स फर्नांडिस यांना पाठिंबा दिला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Benaulim News :

मडगाव, बाणावली जिल्‍हा पंचायत निवडणुकीत चर्चिल आलेमाव यांचे सुपुत्र सावियो आलेमाव यांनी आपला पूर्ण पाठिंबा ग्रेफन्‍स फर्नांडिस यांना जाहीर केला होता. तर चर्चिलचे पुतणे वॉरन आलेमाव यांनी आपली शक्‍ती रॉयला फर्नांडिस यांच्‍या पाठीमागे उभी केली होती.

असे असतानाही या पोटनिवडणुकीत ग्रेफन्‍स फर्नांडिस यांना फक्‍त २,६२३ मते तर रॉयला फर्नांडिस यांना १,८४० मते मिळाली. बाणावली जिल्‍हा पंचायतीच्‍या या निकालाने सध्‍या बाणावलीत एक प्रश्‍न निर्माण झाला आहे तो आलेमाव कुटुंबाचा बाणावलीवरील प्रभाव ओसरला आहे का?

आम आदमी पक्षाचे जोसफ पिमेंता यांना ५,६७२ मते प्राप्‍त झाल्‍यानंतर आम आदमी पक्षाचे गोवा राज्‍य अध्‍यक्ष अमित पालेकर यांनी, इंडिया आघाडी निर्माण झाल्‍यानंतर मतदारांनी लोकसभा निवडणुकीत माेदी परिवाराला धडा शिकविला तर या निवडणुकीने चर्चिल आलेमाव कुटुंबाला, अशी प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली.

या निवडणुकीत चर्चिल आपण कुणालाच पाठिंबा दिला नाही, असे जरी म्‍हणत असले तरी त्‍यांचे पुत्र सावियो यांनी ग्रेफन्‍स फर्नांडिस यांना पाठिंबा दिला होता. आता चर्चिल सावियोशीही आपला काही संबंध नाही, असे म्‍हणणार का, असा प्रश्‍न त्‍यांनी केला.

या निवडणुकीत मी कोणत्‍याही उमेदवाराला पाठिंबा दिला नव्‍हता. जिल्‍हा पंचायतीच्‍या निवडणुका पक्षाच्‍या चिन्‍हावर व्‍हायला माझा पूर्वीपासून विरोध होता. गेल्यावेळी आमचा पराभव झाला. त्‍या दिवसापासून जिल्‍हा पंचायतीच्‍या राजकारणात मी पडणार नाही, असा निर्णय घेतला होता.

- चर्चिल आलेमाव, बाणावलीचे माजी आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT