Benaulim Road Issue  Dainik Gomantak
गोवा

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही बाणावलीत शेतजमिनीत मातीचे भराव

साळ नदी वाचविण्यासाठी बाणावलीकरांचे देवास साकडे, एनजीटीकडेही अर्ज

दैनिक गोमन्तक

मडगाव : पश्चिम बगल रस्त्याचा राहिलेला एक किलोमीटर अंतराचा रस्ता स्टिल्टवर बांधण्यात येणार, असं आश्वासन काल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलं होतं. असं असलं तरीही बाणावली भागात या रस्त्यासाठी शेतजमिनीत मातीचे भराव घालणे चालूच आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये पुन्हा चिंतेचं वातावरण आहे. दरम्यान मातीच्या भरावामुळे पावसात वाहून जाणारे पाणी अडून शेतीचं होऊ नये यासाठी सरकारची मनोवृत्ती बदलावी यासाठी आज स्थानिकांनी प्रार्थनाही केल्या.

फातोर्डा मतदारसंघाचे आमदार आणि गोवा फॉरवर्डचे (Goa Forward) नेते विजय सरदेसाई यांनी काल बुधवारी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एक किलोमीटर अंतराचा पट्टा स्टिल्टवर बांधण्यात येणार, असे सांगितले होते. मात्र असे असतानाही आज या भागात मातीचे भराव घालण्याचे काम चालूच होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या (CM) आश्वासनानंतरही काम कसं सुरु असा सवाल स्थानिकांनी विचारला आहे.

हा रस्ता स्टिल्टवर बांधावा अशी मागणी घेऊन राष्ट्रीय हरित लवादा (एनजीटी) कडे जाणाऱ्या पर्यावरण कार्यकर्त्या रॉयला फर्नांडिस यांनी आमचा मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या आश्वासनावर विश्वास आहे. मात्र आमचा कायदेशीर लढा चालूच राहील. मी लवादासमोर जी याचिका दाखल केली होती, तिचा निर्णय अजून लागायचा आहे. ही याचिका जलदगतीने निकाली काढावी यासाठी मी पुन्हा लवादासमोर अर्ज सादर केला आहे, असे त्यानी सांगितले आहे.

दरम्यान हे काम सुरु करताना राष्ट्रीय हमरस्ता प्राधिकरणाने आपल्या मालकीच्या शेत जमिनीत अतिक्रमण केल्याचा आरोप बाणावली येथील एका शेतकऱ्याने केला असून त्याविरोधात त्याने प्राधिकरणाकडे दाद मागितली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT