Death Body  Dainik Gomantak
गोवा

Food Poisoning Death: मडकई येथे अन्नातून विषबाधा झाल्यामुळे बेळगावच्या तरुणाचा मृत्यू...

मडकई येथे अन्नातून विषबाधा झाल्यामुळे बेळगाव येथील एका 20 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा: मडकई येथे अन्नातून विषबाधा झाल्यामुळे बेळगाव येथील एका 20 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. हा व्यक्ती मुळचा बेळगाव येथील असून, गिरीश शांतप्पा असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी फोंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत मयत रात्री जेवण करून झोपला होता आणि सकाळी तो मृतावस्थेत आढळून आला.

(Belgaum native dies allegedly due to food poisoning at Madkaim goa)

Inferior food बनवणारी आस्थापने रडारवर; मडगावात FDAचे छापे

अन्न आणि औषध प्रशासन खात्याच्या अधिकाऱ्यांनी गैरप्रकाराविरोधात कारवाई सुरुच ठेवली असून काही दिवसांपूर्वी मडगावातील विविध भागांमधील व्यावसायिकांच्या उत्पादन ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. परोठा, सामोसा, चपाती आणि श्‍वर्मासारख्या जिन्नसासाठी वापरले जाणारे पीटा ब्रेड आदींच्या वापरासह अशा प्रकारचे खाद्य पदार्थ करणाऱ्या आस्थापनांवर छापे टाकण्यातआले.

दिकरपाली-मडगाव येथील अरविंद सहानी यांच्या आस्थापनावर छापा टाकला. यावेळी तेथे उघड्यावर खाद्य पदार्थ तयार करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. अशा प्रकारे आरोग्यास अपायकारक वातावरणात पदार्थ तयार करून ते मडगावमधील विविध ठिकाणच्या आघाडीच्या हॉटेल्स, दुकाने, सुपरमार्केटस्‌ यांना पुरविण्यात येत असल्याचे त्यांना आढळून आले होते.

स्वच्छतेबाबतचे नियम न पाळता हा सर्व व्यवहार चालू असल्याचे अधिकाऱ्यांना दिसून आले. सहानी यांच्या दिकरपाली येथील ठिकाणावरून त्यांनी मालाची 110 पाकिटे जप्त (Seized) केली.

अशाच प्रकारे शांती नगर येथे श्रावणकुमार नामक व्यावसायिकाच्या आस्थापनात असाच गैरव्यवहार आढळून आल्याने अधिकाऱ्यांनी तेथील 75 किलो सामोसे नष्ट केले. तर मांडोपा नावेली येथील हफजर के. या व्यक्तीच्या पीटा ब्रेड तयार करण्याच्या उत्पादन ठिकाणावरून 1200 पीटा ब्रेड जप्त केले.

हौसिंग बोर्ड, घोगळ येथील जयसिंग राजपूत या व्यावसायिकाच्या चपाती तयार करण्याच्या ठिकाणावर छापा टाकण्यात आला. तेथील 500 चपात्या जप्त करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. हे सर्वजण स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करण्याबरोबरच विना परवाना हा व्यवसाय चालवित होते असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. या कारवाईत रिचर्ड नोरोन्हा, राजीव कोरडे, अमित मांद्रेकर, प्रिया कोमरपंत, स्वप्निल फातर्पेकर या अधिकाऱ्यांनी भाग घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT