Belagavi police raid 
गोवा

Belagavi: होळीच्या तोंडावर बेळगाव पोलिसांची मोठी कारवाई; गोवा बनावटीची 7.30 लाखांची दारु जप्त

Illegal Alcohol Smuggling In Belagavi: पोलिसांनी एक वाहन देखील ताब्यात घेतले असून, एकूण १०.३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Pramod Yadav

Illegal Alcohol Smuggling

बेळगाव: पोलिसांनी मोठी कारवाई करत गोवा बनावटीचा साठवून ठेवलेला मद्यसाठा जप्त केला आहे. खडेबाजार परिसरात पोलिसांनी ही धडक कारवाई केली. पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली असून, १०.३० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. होळीच्या तोंडावर ही मोठी कारवाई मानली जात आहे.

राकेश अनिक चौगले (वय ३०, रा. न्यू गडशेड रोड, बेळगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ३७० लिटर गोवा बनावटीचे मद्य जप्त करण्यात आले आहे. याची बाजारातील किंमत ७.३० लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. याशिवाय पोलिसांनी कर्नाटक परवाना असलेली एक वाहन देखील जप्त केले आहे. असा एकूण १०.३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राकेश चौगले याने मोठ्या प्रमाणावर गोवा बनावटीचा मद्यसाठा जमा करुन ठेवल्याची माहिती बेळगाव शहर पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तात्काळ याची दखल घेत खडेबाजार परिसरात छापेमारी करत दारुसह १०.३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी बेळगाव पोलिस अधिक तपास करत आहेत. आगामी होळीच्या तोंडावर ही कारवाई मोठी मानली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT