Agonda: मोठी कारवाई! आगोंद किनाऱ्यावरील 17 बेकायदा आस्थापनांना टाळे, वीज कनेक्शनही तोडले

Agonda Illegal Businesses: आगोंद किनाऱ्यावरील कासव संवर्धन भागात बेकायदा थाटण्‍यात आलेल्‍या २० पैकी एकूण १७ आस्थापनांना आज टाळे ठोकण्‍यात आले.
Agonda Illegal Businesses
Agonda NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Illegal businesses sealed in Agonda

आगोंद: आगोंद किनाऱ्यावरील कासव संवर्धन भागात बेकायदा थाटण्‍यात आलेल्‍या २० पैकी एकूण १७ आस्थापनांना आज टाळे ठोकण्‍यात आले. ३ आस्‍थापनांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला आवश्यक परवाने सादर केल्‍याचे समजते.

‘कन्सेट टू ओपरेट’ परवाना नसलेल्या आस्थापनांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने कारवाईचे आदेश दिले होते. त्‍यानुसार आज काणकोण उपजिल्हाधिकारी व मामलेदार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने १७ आस्थापनांना टाळे ठोकले. त्‍यांची वीजजोडणी तोडण्‍यात आली. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Agonda Illegal Businesses
Agonda Beach: आगोंद किनारपट्टी भागातील 20 आस्थापनांना टाळे ठोका! गोवा खंडपीठाचे प्रदूषण नियंत्रण मंडळाला निर्देश

२० आस्थापनांना बजावल्या होत्‍या नोटिसा

गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे आगोंद येथील रिसॉर्टसह २४ पैकी २० आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. त्यांपैकी ८ बांधकामांना टाळे ठोकण्यात आले तर ९ बांधकामे मालकांनी स्वतःहून हटविली. ३ आस्‍थापनांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला आवश्यक परवाने दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com