Goan fisherman Dainik Gomantak
गोवा

बाणावली येथे पारंपारिक मासेमारीला सुरवात

गोव्यातील मासेमारी बंदी 31 जुलै रोजी उठणार

दैनिक गोमन्तक

बाणावली: बाणावली येथील पारंपारिक मच्छिमाऱ्यानी मासळीमारीस आजपासून सुरुवात केली. आज दर्याची पूजा करून त्यांनी आपल्या बोटी समुद्रात उतरवून मासळीमारी करण्यासाठी सुरुवात केली आहे. गोव्यात सध्या यांत्रिकी बोटी घेऊन मासेमारी करण्यासाठी आणखी काही दिवस बंदी असली तरी आम्ही लहान बोटी घेऊन मासेमारी करीत असल्याचे व्यवसायिकांनी सांगितले. गोव्यातील मासेमारी बंदी 31 जुलै रोजी उठणार आहे. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

राज्यात मोठ्या प्रकारच्या होड्या घेऊन खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी राज्य सरकारने दोन महिन्यासाठी बंदी घातली आहे. हा कालावधी जुलै महिन्याच्या शेवटच्या तारखेला संपुष्टात येणार आहे. तरी वार्षिक पद्धतीप्रमाणे आम्ही पाच दिवस अगोदर मासळीमारी करण्यासाठी सुरुवात करीत असल्याचे येथील व्यवसायिकांनी सांगितले.

मच्छिमारांनी कासावली व अन्य ठिकाणी मासळी मारण्यासाठी समुद्रात उतरलेल्या मासेमारी बोटी बंदर आणि कप्तान खात्याने बेकायदेशीर मासळीमारी करीत आल्याच्या कारणाने जप्त केल्या आहेत. त्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या विषयावर बोलताना स्थानिक मासेमारी करणारे व्यवसायिक पेले फर्नाडिस म्हणाले की, या ठिकाणी मोठे ट्रॉलर घेऊन मासळीमारी करीत असलेले व्यवसायिक 100 मीटरच्या आत येऊन मासळीमारी करीत आहेत. हे नियमाच्या विरुद्ध आहे.

संबंधित खात्याने त्यांच्यावर बंदी घालायला हवी. याबरोबरच मालवणहून मोठ्या दर्जाच्या होड्या मासळी मारी करीत आहेत. हे अयोग्य असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वीच्या मंत्र्यांकडून तोंडी आश्वासन घेऊन आम्ही पाच दिवस अगोदर मासळीमारी करण्यासाठी सुरुवात करीत होतो. मात्र काही होड्या जप्त केल्या असल्याने यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. असे ते म्हणाले.

जुझे फर्नांडिस या मासेमाऱ्यानेही आम्हाला मासळीमारी करण्यासाठी परवानगी द्यावी असे सांगितले. मोठ्या होड्या किनाऱ्यालगत मासळीमारी करीत असल्याने आम्हला नुकसान सोसावे लागते असेही ते म्हणाले. होड्या समुद्रात उतरविण्याअगोदर स्थानिक चर्चचे फादर अँथोनी रॉड्रिगीस यांचे आशीर्वादही मच्छिमाऱ्यांनी घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT