Beggar Dainik Gomantak
गोवा

मडगावात भिकारी आणि बेकायदेशीर विक्रेते ठरत आहेत लोकांसाठी डोकेदुखी

ओल्ड मार्केट येथील ट्रॅफीक सिग्नल्स सुरु झाल्यापासुन येथे भिकारी भिक मागत आहेत.

दैनिक गोमन्तक

सासष्टी: मडगावमध्ये भिकाऱ्यांची संख्या वाढली असुन रस्त्यावर बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांची संख्या पण वाढल्याने लोकांना त्याचा त्रास जाणवू लागला आहे. ज्या ठिकाणी वाहतुक सिग्नल्स आहेत, खास करुन जुना बाजार, तिथे छोट्या मुलांना घेऊन बायका वाहन चालकांकडे भिक मागण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यात भर म्हणुन काही बेकायदेशीर विक्री करणारेही चालकांना त्रास देतात. (Goa News Update)

फातोर्डा पोलीसांनी त्यांच्यावर कारवाई करुन काही काळासाठी भिकाऱ्यांना तिथुन हाकलले होते. पण परत भिक मागण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यांच्यावर काय कडक कारवाई करावी याचा फातोर्डा पोलिस (Police) विचार करीत आहेत.

ओल्ड मार्केट येथील ट्रॅफीक सिग्नल्स सुरु झाल्यापासुन येथे भिकारी भिक मागत आहेत. कित्येक वेळा पोलिसांनी कारवाई करुन त्यांना दमदाटी केली पण त्यावर काहीही परीणाम झालेला नाही.

पोलिसांनी काही भिक मागणाऱ्या मुलांना बाल कल्याण समित्यांपुढे उभे केले. त्यांनी त्यांना बाल आश्रमात पाठविले. नंतर त्या मुलांचे पालक पोलिस स्टेशनवर (Police Station) येतात व मुलांना परत करावे लागते, असे पोलिस अधिक्षक कपिल नायक यानी सांगितले.

वाहतुक सिग्नलमुळे वाहने तिथे थांबवली जातात व त्याचाच फायदा हे भिकारी व बेकायदेशीर विक्री करणारे घेतात. जरी करोनाचा उद्रेक थांबलेला असला तरी परिस्थिती अजुन पुर्ण निवळलेली नाही. या भिकाऱ्यांच्या तोंडाला मास्कही (Mask) नसतात.

शिवाय हे भिकारी व त्यांची मुले मध्येच वाहनाच्या आडवी येतात व त्यातुन अपघात होण्याची संभावना आहे. अशा प्रकारचे बारीक सारीक अपघात येथे होतच असतात. पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karnataka Bus Accident: भीषण अपघात! बस लॉरी ट्र्कवर जाऊन आदळली; तिघांचा जागीच मृत्यू, 7 जण गंभीर

Surya Gochar 2025: पैसे मिळणार, करिअर सुधारणार; 'सूर्य गोचर' तुमच्या राशीला काय देणार?

Vote Chori: गोव्यात सापडले नेपाळी मतदार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांचा Ground Survey

Asia Cup 2025: संजू सॅमसन नाही, KL राहुल नाही; आशिया कपबाबत मोठी बातमी, माजी खेळाडूने केला खुलासा

Petrol Diesel Prices In Goa: लॉंग विकेंडला गोव्यात जाताय? पेट्रोल-डिझेलचे ताजे दर जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT