Goa Narkasur Dainik Gomantak
गोवा

Goa Narkasur: 15 बॉक्स बिअर आणि चार हजार कॅश! गोव्यात नरकासूर स्पर्धेनिमित्त विचित्र बक्षीस

Goa Narkasur Competition: धार्मिक उत्सवासाठी बक्षीस स्वरुपात मद्य वाटप केले जाणार असल्याने ही स्पर्धा वादात सापडली आहे.

Pramod Yadav

Goa Narkasur

पणजी: दीपावली जवळ आल्याने गोव्यात नरकासूर बणविण्याची लगबग सुरु झाली आहे. विविध गावात मोठा आणि हटके नरकासूर उभारण्यासाठी तरुणाई रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.

अशात नरकासूर स्पर्धांना देखील राज्यात ऊत आले आहे. अशाच नरकासुर स्पर्धेच्या बक्षिसाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. धक्कादायक बाब म्हणजे या स्पर्धेसाठी चक्क बिअर बॉक्स बक्षीस म्हणून ठेवण्यात आली आहेत.

चोडण- माडेल येथील आई नवदुर्गाच्या वतीने नरकासूर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी लॉटरी पद्धतीने कूपन काढली जाणारयेत.

बक्षिसांची यादी

१) चार हजार रुपये रोख आणि १५ बॉक्स बिअर (किंगफिशर)

२) तीन हजार रुपये रोख आणि दहा बॉक्स बिअर

३) दोन हजार रोख आणि पाच बॉक्स बॉक्स बिअर

४) दीड हजार रोख आणि चार बॉक्स बिअर

५) एक हजार रोख आणि ती बॉक्स बिअर

तसेच

पाच उत्तेजनार्थ बक्षिसे काढली जाणार असून, यातील प्रत्येकाला दोन लहान बॉक्स बिअर आणि पाचशे रुपये रोख बक्षीस स्वरुपात दिले जाणार आहेत.

आयोजकांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार या 'लकी ड्रॉ' चा निकाल २९ ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता जाहीर केला जाणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर ३० तारखेला सायंकाळी चार पूर्वी बक्षीस घ्यावं लागणार आहे, असे आयोजकांनी म्हटले आहे.

या स्पर्धेवरुन आयोजकांवर टीका होत आहे. धार्मिक उत्सवासाठी बक्षीस स्वरुपात मद्य वाटप केले जाणार असल्याने ही स्पर्धा वादात सापडली आहे.

दरम्यान, यापूर्वी एका हॉटेलमध्ये दहीहंडी निमित्ताने बिअर वाटप केले जाणार असल्याचे ऑफर ठेवण्यात आली होती. यावर हिंदू जनजागृती समितीने आक्षेप नोंदवला होता. यानंतर हॉटेलने ती ऑफर तात्काळ मागे घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चांगलीच खोड मोडली! जिवंत कोळंबी खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोरीचा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी उठवली टीकेची झोड

Ro-Ro Car Train Service: गणेशोत्सवापूर्वी कोकण रेल्वेची पहिली रो-रो कार ट्रेन गोव्यात दाखल, जाणून घ्या भाडे?

Porvorim: ओ कोकेरो ते मॉल दी गोवा रस्ता 5 दिवसांच्या गणेश चतुर्थीनंतरच होणार बंद; CM सावंतांनी केले स्पष्ट

Asia Cup 2025: टी-20 आशिया कपमध्ये भारताच्या नावावर 'महा कीर्तिमान'! 'या' संघाविरुद्ध उभारला धावांचा डोंगर; यंदा कोण मोडणार टीम इंडियाचा रेकॉर्ड?

Goa Waterfall Ban: पावसाळ्यातील अपघातांवर अंकुश! उत्तर गोव्यातील धबधबे अन् नद्यांमध्ये प्रवेशास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

SCROLL FOR NEXT